एक्स्प्लोर

अचाट... अफाट.... सोलापुरातील आजोबा सुसाट!

माळशिरस तालुक्यात आजोबा मंडळीसाठी खास सायकल स्पर्धा, 60 ते 75 वयोगटातील आजोबांचा उस्फूर्ट सहभाग

सोलापूर : निवृत्तीनंतर काय... हा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना कायमच सतावत असतो. त्यात ती व्यक्ती ग्रामीण भागातील असेल, तर मग वाढत्या वयाचे ओझे न झेपणारेच. कारण अनेकदा घरातल्या इतर सदस्यांकडून दुर्लक्ष होत असतं. मात्र, अशा एकंदरीत स्थितीत कुणी सायकल स्पर्धेत भाग घेत असेल, तर...? सोलापुरातील 75 वर्षीय आजोबांनी चक्का सायकल स्पर्धेत सहभाग घेतला आणि तब्बल चार किलोमीटरचा मार्गही पूर्ण केला. माळशिरस तालुक्यातील वेळापूर नावाचं गाव आहे. शेतकरी आणि शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात इथे वस्ती आहे. या गावातील जेष्ठ नागरिक संघाने कै. सूर्यकांतदादा माने यांच्या 77 व्या जयंतीचे औचित्य साधून या आजोबा मंडळींसाठी सायकल स्पर्धा ठेवली होती. या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी अनेक आजोबा मंडळी सकाळी वेळापूर चौकात दाखल झाले होते. अगदी 60 वर्षांपासून थेट 75 ओलांडलेल्या मंडळींचा उत्साह देखील वाखाणण्यासारखा होता. वेळापूर चौक ते नागठाणा आणि तेथून परत वेळापूर चौकात पोहोचायचे होते. स्पर्धेचा झेंडा फडकतच स्पर्धेला सुरुवात झाली. या आजोबा मंडळींना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी आयोजक दुचाकीवरून नियोजन करीत होते. मात्र, स्पर्धा रंगात आल्यावर या आजोबा मंडळींच्या सायकलींनी असा वेग घेतला की, दुचाकीवाल्यांनाही त्यांच्या सोबत चालवणे अवघड बनू लागले होते. अखेर या स्पर्धेत दिलीप पताळे यांनी पहिला नंबर पटकावला. मात्र संपूर्ण स्पर्धेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, ते 75 वर्षीय विलास मिसाळ यांनी. या वयातही त्यांच्या सायकलींचा भन्नाट वेग तरुणांनाही लाजवणारा होता. पहिल्याच स्पर्धेतील या जेष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून आता या आजोबा मंडळींसाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे आयोजक अमरसिंह माने यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Maharashtra Live News Updates: गेल्यावर्षी मांजरा नदीला महापूर, यंदा पात्र भेगाळलेलं; सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
Maharashtra Live News Updates: गेल्यावर्षी मांजरा नदीला महापूर, यंदा पात्र भेगाळलेलं; सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
Bajrang Sonwane Speech : खासदार बजरंग सोनवणेंच्या भाषणापूर्वी तरुणाने माईक हिसकावला अन्....; बीडच्या गेवराई तालुक्यातील लोकलढा बैठकीत नेमकं काय घडलं?
खासदार बजरंग सोनवणेंच्या भाषणापूर्वी तरुणाने माईक हिसकावला अन्....; बीडच्या गेवराई तालुक्यातील लोकलढा बैठकीत नेमकं काय घडलं?
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget