सोलापुरात वैज्ञानिकाने वीज कनेक्शन तोडलं, यापुढे स्वत:च करणार वीज निर्मिती
बैलांचा वापर करुन विज्ञानग्राम येथे विज निर्मिती केली जाणार आहे. या वीजनिर्मिती प्रक्रियेत पर्य़ावरणाचा समतोल देखील राखला जाणार आहे.
सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात महावितरणने आकारलेल्या बिलांवरुन प्रश्न उपस्थित होत असताना सोलापुरातील वैज्ञानिक अरुण देशपांडे यांनी वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. विज्ञान दिनाचे औचित्य साधून देशपांडे यांनी स्वत: च्या विज्ञानग्राम संस्थेतील वीज कनेक्शन तोडून टाकलं आहे. विशेष म्हणजे यापुढे स्वत: स्वत;साठी लागणारी विज निर्मिती करणार असल्याचा दावा देखील अरुण देशपांडे यांनी केला.
मागील काही दिवसांपूर्वी देशपांडे यांना 4 लाख रुपयांचे बिल महावितरणतर्फे पाठवण्यात आले होते. मात्र अनेक प्रयत्न करुण देखील बीलमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्याचाच निषेध म्हणून बिलांची होळी करत असल्याचे वैज्ञानिक अरुण देशपांडे यांनी व्यक्त केले. दरम्यान यापुढे शास्वत जीवनशैलीसाठी स्वत:च तयार केलेली वीज संस्थेत वापरणार असल्याची प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली.
शास्वत जीवनशैली जगण्यासाठी गावाकडे शास्त्रीय पद्धतींचा विकास करणे गरजेचे आहे. याच उद्दिष्ठ ठेऊन महाराष्ट्रातील विविध भागातील 16 विद्यार्थी सोलापुरातील अंकोली येथील विज्ञानग्राम येथे अभ्यास शिबरासाठी आले आहेत. या शिबिरार्थींच्या मदतीने विज्ञानग्राम येथे विद्युत निर्मिती करण्यासाठी प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे.
बैलांचा वापर करुन विज्ञानग्राम येथे विज निर्मिती केली जाणार आहे. या वीजनिर्मिती प्रक्रियेत पर्य़ावरणाचा समतोल देखील राखला जाणार आहे. या शिवाय परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांचा वापर करुन वीजनिर्मिती केली जाईल असे मत अरुण देशपांडे यांनी व्यक्त केले.