Sahyadri Devrai Sayaji Shinde : बड्डे आहे झाडाचा ! शंभर वर्ष जुन्या झाडाचा पहिला वाढदिवस साजरा
100 वर्ष जुन्या वडाच्या झाडाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला असं जर तुम्हाला सांगितलं तर क्षणभर तुम्हीही विचारात पडाल. मात्र हे सगळं जुळवून आणलं आहे 'सह्याद्री देवराई' संस्थेने.
Sahyadri Devrai Sayaji Shinde : आतापर्यंत आपल्यातील अनेकांनी स्वत:चे, कुटुंबियांचे, कुत्र्यांचे, मांजरांचे वाढदिवस साजरे होताना पाहिले आहेत. केक कापून, कुत्र्यामांजरांना कपडे घालून, सजावट करुन मोठ्या हौसेने वाढदिवस साजरे केले जातात. मात्र 100 वर्ष जुन्या वडाच्या झाडाचा पहिला वाढदिवस (tree) साजरा करण्यात आला असं जर तुम्हाला सांगितलं तर क्षणभर तुम्हीही (replantation) विचारात पडाल. मात्र हे सगळं जुळवून आणलं आहे. 'सह्याद्री देवराई' (Sahyadri deorai)संस्थेने.
पुण्यातील हडपसर परिसरातील वडाच्या झाडाला साताऱ्यात मागील वर्षी पुनर्रोपणाद्वारे जीवदान दिलं होतं. यावर्षी त्याच झाडाचा पहिला वाढदिवस धुमधड्याक्यात साजरा करण्यात आला. साताऱ्यातील जैवविविधता उद्यानात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वतीने 'सह्याद्री देवराई' संस्थेचे कार्यकर्ते अनोखी मानवंदना दिली. या अनोख्या सोहळ्यात सातारा आणि परिसरातील निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते. सुमारे शंभर वर्ष जुन्या पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात 'सह्याद्री देवराई ' संस्थेला यश एक वर्षांपूर्वी यश आलं आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून प्रजासत्ताकदिनी या राष्ट्रीय वृक्षाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
सह्याद्री देवराई संस्थेनं नेमकं काय केलं?
सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले की, अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान,म्हसवे येथे नेवून पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे.वाढ होत आहे. सर्व वृक्षप्रेमी नागरिक, वारकरी, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमून त्याचा वाढदिवस साजरा करणार केला. रस्त्यांच्या कामात कापले जाणारे वृक्ष अशा पध्दतीने वाचवले पाहिजेत. सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. शंभर वर्षाचं झाड पुनरुज्जीवन करायला फक्त 25 हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून ही झाडं काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे , म्हणून त्याचे सन्मानाने 26 जानेवारी 2022 रोजी म्हसवे ( सातारा ) येथे पुनर्रोपण करण्यात आले होते.
सह्याद्री देवराई संस्था नेमकं काय करते?
आतापर्यंत साधारण 29 देवराई , 1 वृक्ष बँक , 14 गड किल्ले या सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान सुमारे 10 लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करणाऱ्या सह्याद्री देवराई या संस्थेनं वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. साताऱ्यातही दुर्मिळ झाडांचे जैवविविधता उद्यान तयार केले जात आहे. उद्यानात ते मेहनत घेताना अनेकदा दिसून येतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील पश्चिम घाटामध्ये असणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि वृक्ष त्याच बरोबर देशातील इतर राज्यातील 600च्या वर असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू करण्यात आला आहे.
पुणे-बंगळुरु महामार्गालगत साताऱ्यातील म्हसवे गावाच्या बाजूला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महामार्गाजवळील पोलीस गोळीबार मैदानाच्या 30 एकर जागेत सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांच्यावतीने हे अनोखे उद्यान उभारण्यात येत आहे.राज्यात ठिकठिकाणी रॉक गार्डन,कॅक्टस गार्डन,ऑर्किड गार्डन ,बोन्साय गार्डन उभारण्यात येत आहे. विविध प्रजाती,गवत,वेली जपली जात असून पुढच्या पिढयांसाठी हा वारसा पुढे नेला जात आहे.आधुनिक तंत्राने वृक्ष स्वतःची माहिती सांगतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. सुमारे 500 वृक्षांना आतापर्यंत क्यू आर कोड तयार करून लावले गेले आहेत. पश्चिम घाटात उगवणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पती या देवरायांमध्ये जतन करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे