एक्स्प्लोर
Advertisement
महाडमधील सावित्री नदीवरील पूल 30 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार
महाड (रायगड) : महाडमधील अपघातग्रस्त सावित्री नदीवरील पूल 30 जूनपर्यंत पूर्ण होत वाहतुकीकरता खुला होणार आहे. सावित्री नदीवरील अपघातग्रस्त पुलाच्या जागी नवा पूल 30 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितित पूर्ण होणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला केला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवरील महाडमधील सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे 3 ऑगस्ट 2016 ला वाहून गेला होता.
राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची देखभाल करणाऱ्या राज्य सरकारच्या हलगर्जीपणाबद्दल विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.
राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताग्रस्त पुलाच्या ठिकाणी नव्या पुलाचे काम पावसाळ्यानंतर सुरु करत 180 दिवसांत पूर्ण करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार पावसाळ्यानंतर काम जोरात सुरु झाले असून, 30 जूनपर्यंत नवा पूल बांधूंन पूर्ण करणार असल्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement