आंगडिया खंडणीप्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणीत वाढ होणार, लुकआऊट सर्क्युलर निघण्याची शक्यता
Angadia Extortion Case : आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
![आंगडिया खंडणीप्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणीत वाढ होणार, लुकआऊट सर्क्युलर निघण्याची शक्यता Saurabh Tripathi's troubles will increase in Angadiya ransom case lookout circular likely to be issued आंगडिया खंडणीप्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणीत वाढ होणार, लुकआऊट सर्क्युलर निघण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/f943dbf77d0bb1eeb11f0db1e7cfdb0d_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Angadia Extortion Case : आंगडिया खंडणीप्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सौरभ त्रिपाठींविरोधात लुकआऊट सर्क्युलर निघण्याची शक्यता आहे. आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
अंगडीया खंडणी वसुली प्रकरणात गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटनं लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम, पीएसआय समाधान जमदाडे अशी तिघांना अटक केली होती. हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी सध्या फरार आहेत.
काय आहे प्रकरण?
डिसेंबर 2021 रोजी अंगडिया असोसिएशननं मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याशी संपर्क साधून डीसीपी त्रिपाठी यांच्यावर आरोप केला की, डीसीपी झोन 2 कडून व्यवसायिकांचा व्यवसाय सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 10 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आयुक्तांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी झोन 2 मधील एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनचे निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा, वंगाटे आणि एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक केलेल्या अधिकार्यांवर डिसेंबर महिन्यात अनेकवेळा अंगाडिया असोसिएशनच्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची किंवा आयकर विभागाला त्यांच्या बेकायदेशीर कृतींबद्दल माहिती देण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 18 ते 20 लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. पुढील तपासांत त्रिपाठीविरोधातही खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकीय कारवाई म्हणून विभागीय चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला डीसीपींच्या निलंबनासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. 18 फेब्रुवारी रोजी त्रिपाठींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तेव्हापासून ते सेवेवर गैरहजर आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने (सीआयय़ू) त्रिपाठी यांना फरार घोषित केलेलं आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अखेर 20 मार्च रोजी डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनावर स्वाक्षरी केली.
कोण आहेत सौरभ त्रिपाठी?
त्रिपाठी, हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी असून एमबीबीएस आणि एमडी (त्वचाविज्ञान) पदवीधर असून त्यांनी मुंबईतील नायर रुग्णालयात शिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्यांनी डीसीपी झोन 4, वाहतूक पोलिसात डीसीपी, डीसीपी एसबी (1) म्हणून पदभार सांभाळला आहे, त्यापूर्वी अहमदनगरचे एसपी देखील होते. याप्रकरणानंतर त्यांची डीसीपी झोनमधून डीसीपी ऑपरेशन्स या पदावर बदली करण्यात आली होती परंतु फरार असल्यामुळे त्यांनी हा पदभार स्वीकारला नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)