एक्स्प्लोर
महाबळेश्वरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, ट्रेकर्सनी दाम्पत्याला वाचवलं
महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपने त्यांच्या ट्रेकर्सना विविध पॉईंटवर पाठवलं.
सातारा : साताऱ्यातील महाबळेश्वरमधील आर्थर सीट पॉईंटवर आत्महत्या करायला गेलेल्या दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपच्या अलर्टमुळे या पती-पत्नीला वेळीच पकडलं.
या दाम्पत्याचा घरी कुटुंबासोबत वाद झाला होता. 'आम्ही महाबळेश्वरला आत्महत्या करायला जात आहे,' असं नातेवाईकांना सांगत हे दाम्पत्य घराबाहेर पडलं. घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांना फोनवरुन याबाबत कळवलं. त्यानंतर पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सलाही याची माहिती दिली.
महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपने त्यांच्या ट्रेकर्सना विविध पॉईंटवर पाठवलं. आर्थर सीट पॉईंटवर आत्महत्या करायला आलेल्या या दोघांची ट्रेकर्सनी फोटोच्या साहाय्याने ओळख पटवली. ट्रेकर्स वेळीच या पॉईंटवर पोहोचल्याने त्यांनी पती-पत्नीला आत्महत्या करण्यापासून थांबवलं. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement