एक्स्प्लोर
महिन्याभरात माझं लग्न आहे, अक्षता टाका : उदयनराजे
साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई याच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते.
सातारा : साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा आघाडी सरकारचे धिंडवडे काढले आहेत. 'महिन्याभरात माझं लग्न आहे, अक्षता टाका,' असं म्हणत उदयनराजेंनी तुफान टोलेबाजी केली. साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई याच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना उदयनराजे म्हणाले की, "महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन-चार महिन्यांनंतर ह्यांचं लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा, एवढंच सांगतोय. एक... टाकू नका, नाहीतर तुम्ही म्हणाल, अहो तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षता टाकल्या. आता शिल्लकच राहिल्या नाहीत. तसल्या काही स्कीम काढू नका हं, सांगतोय."
दुसरीकडे लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा लोकसभा मतदारसंघासाठी कोणाला तिकीट द्यायचं हे निश्चित केलेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंचे हं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातं आहे. राष्ट्रवादीकडून तिकीटाची टांगती तलवार दिसत असल्यामुळे त्यांनी शिवसेना-भाजप युती सरकारचं गुणगान गायला सुरुवात केली आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement