एक्स्प्लोर
शौचालय वापरा, एक गुंठा प्लॉट मिळवा, सरपंचाची ऑफर
उस्मानाबाद : उस्मानाबादच्या एका सरपंचानं नातीच्या वाढदिवसानिमित्त गावासाठी अनोखी योजना जाहीर केली आहे. गावातला जो ग्रामस्थ शौचालयाचा 100 टक्के वापर करेल त्याला एक गुंठ्याचा एक प्लॉट मोफत मिळेल.
सरपंचानं योजनेसाठी 1 कोटी 40 लाखाच्या पाच एकर जमिनचं दानपत्र केलं आहे. शौचालय वापरणाऱ्या 140 ग्रामस्थांना मोफत प्लॉटचा लाभ मिळणार आहे. योजना ऐकुन गाव आनंदलं आहे. पण सरपंचाच्या दानशूरपणामागे जिल्हा परिषदेची निवडणूक हेसुद्धा एक कारण आहे.
नातीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तीन हजार लोकसंख्येच्या मुर्टा गावाला मोठी बक्षिसी मिळणार आहे. गावातला जो ग्रामस्थ 100 टक्के शौचालयाचा वापर करेल त्याला या पाच एकर मधल्या 140 प्लॉटपैकी एक गुंठ्याचा प्लॉट बक्षिस मिळेल. गावात योजनेचे भले मोठे होर्डिंग्ज लागले आहेत.
सरपंचानं गावासाठी दान केलेल्या जमिनीचा आजचा बाजार भाव एक कोटी 40 लाख रुपयांच्या घरात आहे. गावात प्लॉट घेण्यासाठी गुंठ्याला एक लाख मोजावे लागतात. सरपंचाच्या या निर्णयाला संपूर्ण सुरवसे कुटुंबाचा पाठिंबा आहे.
मुर्टा गावात साडेचारशे घरं आहेत. यापैकी 140 नोकरदार आहेत. गावात विविध सरकारी योजनेतून शंभर टक्के शौचालयं झाली आहेत. पण वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिक शौचालय वापरत नव्हते. सरपंचाने योजना जाहीर करताच अख्ख्या गावानं शौचालयाचा शंभर टक्के वापर करण्याचा निर्धार केला आहे.
सत्यवान सुरवसे कष्टाळू शेतकरी म्हणून ओळखले जातात. सुरवसेंनी सहा एकरात 95 लाखाची वांगी पिकवण्याचा विक्रम केला आहे. पंचक्रोशीत सामाजिक कामासाठी ते प्रसिद्ध आहेत. सुरवसे भाजपचे सक्रिय सदस्य आहेत. दुसऱ्यांदा ते सरपंचपदी निवडून आले आहेत.
यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकींसाठी गावाशेजारच्या नंदगाव गटातून पक्षाचे उमेदवार असतील. त्यामुळे या दानशूरपणाला गावागावात अतिशय प्रतिष्ठेने लढवली जात असलेली जि.प. निवडणूकही कारणीभूत आहेच.
विशेष म्हणजे सुरवसेंनी जी योजना लढवली आहे, ती निवडणूक आयोगाच्या कचाट्यात येणार नाही. याला परमार्थ आणि स्वार्थाची सांगड म्हटलं तरी वावगं ठरु नये.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रीडा
बातम्या
फॅक्ट चेक
Advertisement