संतोष देशमुख हत्या प्रकरण! सरकारी पक्षाकडून व्हिडिओचे पुरावे सादर, पुढील सुनावणी 23 डिसेंबरला होणार
बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh murder case) महत्वाची अपडेट समोर आली आहे.
Santosh Deshmukh murder case : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh murder case) महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 डिसेंबर रोजी होणार आहे. सरकारी पक्षाकडून आरोपीच्या वकिलांना व्हिडिओचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. मात्र हे व्हिडिओ पुरावे व्हायरल होऊ नये असे न्यायालयाने आरोपीच्या वकिलांकडून लिहून घेतले आहे. संतोष देशमुख यांना मारहाणा करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नये याची जबाबदारी वकिलांची असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुरावे पाहण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती
दरम्यान, पुरावे प्राप्त झाले मात्र ते पुरावे पाहण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती. व्हिडीओचा पेन ड्राईव्ह आम्ही आरोपीच्या वकिलांना दिला असल्याची माहिती सरकारी पक्षाने सांगितले आहे. लॅपटॉप मधील डेटा आम्हाला मिळावा असे मत आरोपीचे वकीलांनी व्यक्त केले आहे. लॅपटॉप मधील पुरावे आम्ही उघडून पाहिले नाहीत, तसाच लॅपटॉप आम्ही फेरॉन्सिक लॅबकडे पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले होते. सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या सहा आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेले. या ठिकाणापासून एका बाजूला सुदर्शन घुलेचे शेत आहे. त्याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केली. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. 15 व्हीडिओ आणि 8 फोटो आरोपीकडे मिळाल्याची नोंद आहे. या व्हीडिओत ते आरोपी प्रत्यक्ष मारताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहेत. हे फोटो जेव्हा पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा राज्यात संतापाची लाट उसळली होती. 12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले होते. त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले? याचे तपशील दिले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. नंतर अटकसत्र सुरू झाले होते.
महत्वाच्या बातम्या:























