संतोष देशमुखांच्या हत्येला 68 दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला अटक करा, मस्साजोगमधील ग्रामस्थांची मागणी, आज होणार बैठक
संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder case) आम्ही मागच्या दोन महिन्यापासून ज्या मागण्या करतोय त्या पूर्ण होत नसल्याचे मत मस्साजोगमधील नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

Santosh Deshmukh Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder case) आम्ही मागच्या दोन महिन्यापासून ज्या मागण्या करतोय त्या पूर्ण होत नाहीत, म्हणून आम्ही बैठक घेत आहोत असे मत मस्साजोगमधील (Massajog) नागरिकांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी आणखी मोकाट आहेत, त्यांना सह आरोपी केलं जात नाही. या प्रकरणांमध्ये मोठ्या सरकारी वकिलाची मागणी आम्ही केली होती, ती देखील पूर्ण होत नाही असे मत नागरिकांनी व्यक्त केले. दरम्यान, आज धनंजय देशमुख यांच्यासोबत नागरिक एकत्रित बसून निर्णय करणार आहेत. कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यापेक्षा त्याला अटक करा, असी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मोठ्या सरकारी वकिलाची मागणी करुनही पूर्ण नाही
यापूर्वी वाल्मिक कराडवर खंडणी सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मस्साजोगमधील नागरिकांनी एकत्रित येऊन एका आंदोलनाची दिशा ठरवली होती. त्या आंदोलनाच्या उद्रेकानंतर वाल्मीक कराडवर संतोष देशमुख हत्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा एकदा मसाजोगमधील नागरिक एकत्र येऊन बैठक घेत आहेत. पोलिसांना यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वेळोवेळी तपासाची मागणी करुन सुद्धा अनेक आरोपी आणखी मोकाट आहेत. ज्यांना सह आरोपी केलं जात नाही. यासोबतच या प्रकरणांमध्ये मोठ्या सरकारी वकिलाची मागणी आम्ही केली होती, जी पूर्ण होत नाही अशा सगळ्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आज रात्री मस्साजोगमध्ये नागरिकांची बैठक होणार आहे. धनंजय देशमुख यांच्यासोबत नागरिक एकत्रित बसून निर्णय करणार आहेत.
खासदार सुप्रिया सुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सुप्रिया सुळे या परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे या मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरने पहिल्यांदा मस्साजोगमध्ये येतील त्यानंतर त्या परळी शहरामध्ये हेलिकॉप्टरने जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचा सुद्धा सांत्वन करण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी तत्परता धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी दाखवली ती देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी का दाखवली नाही; धनंजय देशमुखांचा सवाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

