Sankashti Chaturthi 2021: आजच्या संकष्टी चतुर्थीला आहे विशेष महत्व; जाणून घ्या व्रत, चंद्रोदय कधी?
आज श्रावणातील संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) . श्रावण महिन्यातील ही संकष्टी असल्याने गणेशभक्तांमध्ये आज विशेष उत्साह, आनंद असतो.

Sankashti Chaturthi 2021 : श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. हा महिना सणासुदीचा महिना आहे. श्रावणातला प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यातलाच एक महत्वाचं म्हणजे श्रावणातील संकष्टी चतुर्थी. (Sankashti Chaturthi).श्रावण महिन्यातील ही संकष्टी असल्याने गणेशभक्तांमध्ये आज विशेष उत्साह, आनंद असतो. दरम्यान प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. त्यापैकी वद्य पक्षातील चतुर्थी 'संकष्टी' तर शुक्ल पक्षातील चतुर्थी 'विनायकी' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.
गणपती बाप्पाचे भक्त आजच्या दिवशी संकष्टीचं व्रत म्हणून उपवास करतात. सार्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि संकटं दूर व्हावी या कामनेतून संकष्टी चतुर्थीचं व्रत केले जाते. सायंकाळी चंद्रोदयानंतर या व्रताची सांगता करण्याची प्रथा आहे.
या संकष्टीच्या दिवशी गणपतीची विशेष रुपाने पूजा केल्यास नकारात्मक प्रभाव दूर होऊन सकारात्मकता निर्माण होते. गणरायाला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखलं जातं. जो व्यक्ती आजच्या दिवशी व्रत ठेवतो आणि पूर्ण आस्थेसह पूजा करतो त्याचा गणपती प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. हे व्रत सूर्योदयापासून सुरु होते आणि चंद्र दर्शनानंतर पूर्ण होते.
तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून
मुंबई - 21.06
पुणे- 21.02
नाशिक- 21.02
नागपूर- 20.40
रत्नागिरी- 21.05
बेळगाव- 21.00
गोवा- 21.02
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या





















