सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात, स्वत: शरद पवार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात; संजय शिरसाट यांचा दावा
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : जयंत पाटील काय शरद पवार हे देखील भाजपच्या संपर्कात आहे. विधानसभा निवडणुकीत आणखी लोकं संपर्कात येतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
Sanjay Shirsat : राज्याच्या महिलांसाठी महत्वाकांशी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन (Ladaki Bahin Yojana) विरोधक आधी म्हणाले होते की, पैसे नाही तर ही फक्त घोषणा आहे. मात्र आता या योजनेला भरघोष प्रतिसाद मिळत असल्याने त्याला कॉन्टॅर करण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे. जयंत पाटील (Jayant Patil) काय शरद पवार (Sharad Pawar) हे देखील भाजपच्या संपर्कात आहे. मविआतील सगळे आमच्या संपर्कात आहे, या गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात. मात्र ते आधीपासूनच आमच्या संपर्कात आहे. विधानसभा निवडणुकीत आणखी लोकं संपर्कात येतील आणि सर्व चित्र स्पष्ट होईल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेला कॉन्टॅर करण्यासाठी विरोधकांकडून घटनेचे भांडवल
बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर तेथील नागरिकांनी रोष व्यक्त केलाय. याची तीव्रता राज्य आणि देशभर पाहायला मिळाली आहे. या घटनेचा बोध सर्वांनी घेतला आहे. यात राजकारण केलं गेलं नाही पाहिजे, पण काही लोक यात राजकारण करत आहेत. गृहमंत्री यांचा राजीनामा मागत आहेत. अशावेळी सरकारमध्ये कोण यापेक्षा एकत्र येऊन याचा धडा घेतला पाहिजे, मात्र काही जण केवळ मोर्चे काढत आहे. बदलापूरच्या स्थानकावर उभे असलेल्या लोकांचं राजकारण केले जात आहे. परिणामी काल लाठीचार्ज करावा लागला. त्यामागील कारण म्हणजे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होत होती. आज राज्यात 95 टक्के कॉलेज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत. तिथे रॅगिंग होत नाही का? काही लोक मोर्चे काढत असून, लाडकी बहीण योजनेला कॉन्टॅर करण्यासाठी या घटनेचं भांडवल केले जात असल्याचा आरोपही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांना काँग्रेस सांगेल तसं वागावे लागतंय - संजय शिरसाट
काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते की मी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला आहे. त्यामुळे काँग्रेस जसे त्यांना सांगेल तसं त्यांना आता वागावे लागणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी देखील दिवसभर काँग्रेसचा पट्टा गळ्यातून काढला नव्हता. अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केलीय. तर उज्वल निकम यांनी अतिरेक्यांना फाशीवर लटकवले आहे. त्यांनी आपली कामगिरी आणि योग्यता नेहमी सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बदलापूर प्रकरणात आम्हाला अपेक्षा आहे.असेही ते म्हणाले.
आणखी वाचा