नाना पटोलेंचं अस्तित्व कमी होतंय, आघाडी आता टिकणार नाही; संजय शिरसाटांचा मविआवर हल्लाबोल
Maharashtra Politics : वंचितला वेळ देणारे नाना पटोले कोण, नाना पटोले यांचं अस्तित्व कमी होतं चाललंय, असं म्हणत शिरसाट यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
मुंबई : शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे (Shinde group) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महाविकास आघाडीवर (Maha ) निशाणा साधला आहे. मविआतील जागावाटापाचा तिढा अद्याप कायम असल्याने महाविकास आघाडी बिघाडी झाली आहे. आघाडी आता टिकणार नाही, असं शिरसाट म्हणाले आहेत. वंचितला वेळ देणारे नाना पटोले कोण, नाना पटोले यांचं अस्तित्व कमी होतं चाललंय, असं म्हणत शिरसाट यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. संजय शिरसाट पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाना पटोलेंचं अस्तित्व कमी होतंय - शिरसाट
नाना पटोले यांचं स्वतःचं अस्तित्व कमी होत चाललं आहे. त्यांनाच पक्षामध्ये किती स्थान आहे, हे पाहायला हवं. तीन वाजेपर्यंत निर्णय घ्या वेळ देतो, असं चालत नाही. तुम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहात. आघाडीत बिघाडी झाली त्यातच काय होतंय बघू. आघाडी आता टिकणार नाही, हे मी पूर्वीपासून सांगतोय आणि याचा प्रत्यय तुम्हाला पुढच्या एक-दोन दिवसात येईल.
संजय राऊतांवर नाना पटोलेंचा आरोप
संजय राऊत हे काँग्रेसच्या किचन कॅबिनेटमध्ये आहेत, लवकरच ते जेलमध्ये जातील. संजय राऊतांवर सगळे टीका करताय . तुम्ही पक्ष सांभाळू शकत नाही. आघाडी ठेऊ नये कांग्रेससोबत राहू नये यासाठी, संजय राऊत काम करत आहेत. अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, असं शिरसाट यांनी सांगतलं. दरम्यान, काँग्रेसचा राजीनामा दिलेले संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, संजय निरुपम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटीसाठी येतील, त्यांना पक्षात येऊ द्या, त्यांनतर यावर बोलू.
खडसेंच्या घरवापसीच्या निर्णयाचं स्वागत
संजय शिरसाट म्हणाले की, शनिवारी कल्याण आणि भिवंडी मतदारसंघाबाबत चर्चा झाली वाद संपुष्टात आला आहे. वर्षावर कोअर कमिटी बैठक झाली. लोकसभेच्या मतदारसंघ बदल तिकीट देण्याबाबत चर्चा झाली. खासदार आमदारांचे पुर्नवसन केले जाईल, सहकार्य करावे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. खडसे यांनी भाजपत काम केले, काही वेळा खटके वाजले, परंतु आता घरवापसीचा निर्णय घेतला आहे, याचं स्वागत आहे, असंही ते म्हणाले आहेत.