राऊतांकडून बावनकुळेंचा परदेशात कथित जुगार खेळतानाचा फोटो ट्वीट, भाजपकडून आदित्य ठाकरेंचा 'ग्लास'सोबतच्या फोटोने उत्तर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचा फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो गंभीर असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे कधीच जुगार खेळलेले नाहीत, असे म्हणत महाराष्ट्र भाजपाने (Maharastra BJP) संजय राऊतांच्या ट्वीटवर स्पष्टीकरण दिले आहे.
संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये (Sanjay Raut Tweet) म्हणाले, 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा आहे.
19 नोव्हेंबर
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q
भाजपचा संजय राऊतांना सवाल (BJP Tweet)
तर संजय राऊतांच्या ट्वीटला भाजपने उत्तर दिले आहे. भाजपने उत्तर देताना आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतील फोटो ट्वीट केला आहे आणि संजय राऊतांना आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे, असा प्रश्न उपस्थित केल आहे. भाजपने आपल्या म्हटले आहे की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही.
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 20, 2023
ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.
असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ @rautsanjay61 , आदित्य… pic.twitter.com/TGCTOeNpYx
फोटोची सीबीआय चौकशी झाली पाहिजे : नाना पटोले
दरम्यान यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, भाजपचे प्रांताध्यक्ष कसिनो खेळतानाचा एक फोटो संजय राऊतांनी ट्विट केलाय.हा फोटो गंभीर आहे, याची चौकशी झाली पाहिजे. एकीकडे राज्य दिवाळखोरीत निघतंय.कंत्राटदारांना पैसे मिळत नाहीत म्हणून ते संपावर जात आहेत.राज्याची तिजोरी खाली आहे मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे एवढा पैसा आला कुठून आला. या फोटोची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.
हे ही वाचा :