एक्स्प्लोर

भारत नव्हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भाजप हरली, वानखेडे स्टेडियमवर फायनल का नव्हती? संजय राऊतांचा बोचरा सवाल

हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलियानसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष आता हरलात ना? भारत संघ उत्तम खेळला, हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shiv Sena) यांनी केला.

मुंबई : "भारतीय संघ हरला (Team India World Cup) ते दुःख सर्वांना झाले आहे. या देशांमध्ये खिलाडूवृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजीत होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi stadium Gujrat) भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबईतील वानखेडे मैदानात (Wankhede Stadium Mumbai) होतात. मात्र यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी  घुसली. त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले. भाजप (BJP) सर्व श्रेय आपल्याकडे घेण्याचा विचार करत होता", असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shiv Sena) यांनी केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव (India vs Australia world cup final) केला.  प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्व बाद 240 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताचं हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केलं. विश्वचषकाची फायनल गुजरातच्या अहमदाबादमध्ये खेळवण्यात आली. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित होते.  

संजय राऊतांचा हल्लाबोल (Sanjay Raut on BJP)

हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलियानसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष आता हरलात ना? भारत संघ उत्तम खेळला, हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता .मात्र ज्या पद्धतीने राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती, भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरले, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. 

कपिल देवच्या संघाला निमंत्रण का नव्हतं? 

सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळून दिला कपिल देव (Kapil Dev) आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही. कपिल देवच तिथे आगमन झालं असतं इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं याला म्हणतात राजकारण, असं संजय राऊत म्हणाले. पडद्या मागचे राजकारण काल झालं. भविष्यात त्याची नक्कीच चर्चा होणार, असा हल्लाबोल राऊतांनी केला. 

क्रिकेटची पंढरी मुंबई. मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचं. पैसा घेऊन जायचं. कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायचे आणि क्रिकेटदेखील घेऊन जायचं, असं घणाघात राऊतांनी केला. 

ठाकरे गट स्मृतिदिन राडा

यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी झालेल्या राड्यावरही भाष्य केलं. "राड्याची सुरुवात कोणी केली त्यांच्यावरती कारवाई का केली नाही? मुंब्रा शाखेवरती ज्यांनी बुलडोजर चढवला त्यांच्यावरती कारवाई का केली गेली नाही?, असे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केले. 

नोटिसांना कोण विचारतोय? 

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर गद्दार आणि बेईमान लोकांनी पाय ठेवू नये. गद्दारांना तुडवा असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. आपण स्वतःला शिवसैनिक समजतात मग आमच्या लोकांनी  तुडवण्याचा प्रयत्न केला असेल तर कशाला गुन्हे दाखल करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. 

 शिवसैनिक संयमीपणे वागले. नोटिसांना कोण विचारतो पाठवा नोटिसा. 2024  पर्यंत तुम्हाला जेवढा कागदा वाया घालवायचा तेवाढ घालवा, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला.   

Sanjay Raut PC VIDEO : संजय राऊत यांचा हल्लाबोल, संपूर्ण पत्रकार परिषद

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget