'मुख्यमंत्री संकुचीत मनोवृत्तीचे', सह्याद्रीवरील सर्वपक्षीय बैठकीवरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
मुख्यमंत्र्यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. 31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे घरी बसणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. शरद पवार, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना या बैठकीसाठी बोलवण्यात आले नाही. यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्या गैऱ्यांना पक्षांना निमंत्रण दिलं. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बोलवण्यात आलं नाही. त्यावरुन संकोचीत मनोवृत्ती दिसते, अशी टीका संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली आहे.
संजय राऊत म्हणाले, मनोज जरांगेंच्या उपोषणावर मार्ग निघणे गरजेचे आहे. संकोचीत मनोवृत्तीतून मार्ग निघणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्या गैऱ्यांना पक्षांना निमंत्रण दिलं आहे. मात्र उद्धव ठाकरेंना बोलवण्यात आलं नाही. यातून त्यांची संकोचीत मनोवृत्ती दिसते. अंबादास दानवेंना विरोधी पक्ष नेते म्हणून बोलावलं आहे. उद्धव ठाकरेंची भीती असल्याने शिंदेंनी ठाकरेंना बोलावलं नाही.
31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे घरी बसणार : संजय राऊत
उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर राऊतांच्या या आरोपांवर शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी हा दावा फेटाळला आहे. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. 31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे घरी बसणार आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणार्या या सरकारचा जाहीर निषेध : अरविंद सावंत
तर अरविंद सावतांनी देखील ट्वीट करत टीका केली आहे. मत्सर, घृणा आणि अहंकाराने भरलेल्या सरकारने बुद्धी गहाण ठेवल्याचा अनुभव येत आहे. मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्र पेटला असताना सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली, परंतु त्या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बोलावले नाही. हे कशाचे द्योतक आहे? हा निर्लज्जपणाचा कळस आहे. बेगुमान आणि बेमुवर्तपणे सरकार चालवणारे, जनतेच्या प्रश्नांचं गांभीर्य नसलेलं, त्यांच्या भावनांबद्दल कळकळ नसलेलं हे घटनाबाह्य सरकार आज ना उद्या जाईलच पण काळच त्यांच्यावर सूड उगवेल. महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणार्या या सरकारचा जाहीर निषेध
हे ही वाचा :
Eknath Shinde : 'मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल