एक्स्प्लोर

राजू शेट्टींच्या गळ्यातील मंगळसूत्र काँग्रेसचंच : संजय कोले

राजू शेट्टींच्या गळ्यातील मंगळसूत्र हे काँग्रेसचंच आहे, असं म्हणत या शेतकरी संघटनेने शेट्टींवर निशाणा साधला.

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीवर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने टीका केली. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी ही टीका केली. राजू शेट्टी हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. पण आजपर्यंत आपल्या गळ्यातील मंगळसूत्र कुणाचं आहे हे ते सांगत नव्हते. मात्र राहुल गांधींसोबतच्या भेटीतून ते मूळचे काँग्रेसचेच असल्याचं आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हे काँग्रेसचं असल्याचं सिद्ध झालं. ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर वेगवेगळ्या कायद्यातून टाच आणली त्याच काँग्रेससोबत राजू शेट्टी काही दिवसात गेलेले दिसतील, असंही शेतकरी संघटनेने म्हटलं आहे. काँग्रेस प्रणित यूपीएशी राजू शेट्टीची ही जवळीक म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे, असा आरोपही शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केला. राजू शेट्टी आणि राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट झाली. या भेटीनंतर भाजपप्रणित एनडीएची साथ सोडलेले राजू शेट्टी आता यूपीएची साथ देणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. येत्या 29 मार्च रोजी देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी राजू शेट्टींनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असणारे राजू शेट्टी 2019 च्या निवडणुकीला यूपीएसोबत जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यासंदर्भातील अधिकृत घोषणा केलेली नाही. या भेटीच्या वेळी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश हे उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. सत्तेत सहभागी असूनही राजू शेट्टी कमालीचे नाराज होते. त्यामुळेच सत्तेला रामराम ठोकून ते एनडीएमधून बाहेर पडले होते. संबंधित बातम्या :

2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यूपीएसोबत?

कशी ठरली राजू शेट्टी आणि राहुल गांधींची अचानक भेट?

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget