एक्स्प्लोर
Advertisement
पंकजा मुंडेंना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या मेळाव्याला गांभीर्याने घेऊ नका : संजय काकडे
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले आहे. काकडे म्हणाले की, ज्या व्यक्तीला मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्यामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही,
पुणे : ज्या व्यक्तीला मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्यामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही, असे मत व्यक्त करत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले आहे. पंकजा मुंडे यांच्या कालच्या मेळाव्याला फारश्या गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मुंडे यावेळी म्हणाल्या की, मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला काढून टाकायचे असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा खासदार संजय काकडे यांनी निषेध केला आहे.
काकडे म्हणाले की, पाच वर्षे मंत्री असूनही, तिथल्या लोकसभेची खासदारकी कुटुंबात असूनही जी व्यक्ती 30 हजार मतांच्या फरकाने पराभूत होते. चाळीस वर्ष राजकारणात असूनही ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही. पंकजा मुंडे यांनी कोणालाच जवळ केलं नाही. मराठा समाज, मुस्लीम समाज, ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळेच त्या पराभूत झाल्या.
काकडे म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी काल घेतलेल्या मेळाव्याला फारश्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पंकजा मुंडे यांनी पक्षाने माझ्याबद्दल निर्णय घ्यावा, असे वक्तव्य केले, मी त्याचा निषेध करतो. एकीकडे त्या म्हणतात की, पक्ष माझ्या बापाचा आणि दुसरीकडे म्हणतात की, पक्षाने निर्णय घ्यावा. पण पक्ष सगळ्यांच्या बापांचा आहे.
पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यावर टीका करताना काकडे म्हणाले की, परळीच्या मेळाव्याच्या निमित्ताने जमलेले लोक गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे होते, म्हणून ते तिथे गेले होते. पुन्हा पंकजा मुंडे यांनी त्या लोकांना बोलावले, तर कोणीही तिथे जाणार नाही. कालचा मेळावा हा मुंडे कुटुंबाचे अस्तित्व टिकवण्यासाठी होता. गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाने राजकारणातील अस्तित्व टिकवावे. परंतु त्यासाठी इतरांवर आरोप करु नये.
प्रकाश मेहतांबद्दल बोलताना काकडे म्हणाले की, प्रकाश मेहतांवर अनेक आरोप होते. त्यांच्या समाजाचे त्यांच्याबद्दल मत चांगले नव्हते. त्यामुळे त्यांच्याऐवजी दिलेला उमेदवार तिथे निवडून आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
क्राईम
Advertisement