एक्स्प्लोर

वडेट्टीवार अन् महापौर बाईंनी जास्त चाभरेपणा करू नये; संजय गायकवाडांचा यु-टर्न, म्हणाले, मी  तुमच्या पक्षांबद्दल बोललो

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी 2 ते 3 कोटी रुपये खर्च करावे लागतात. तर कधी कधी 100 बोकड सुद्धा द्यावे लागतात असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं.

Sanjay Gaikwad : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपये खर्च करावे लागतात. तर कधी कधी 100 बोकड सुद्धा द्यावे लागतात असं वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)  यांनी काल एका सभे दरम्यान केलं होतं. यावर विरोधकांनी टीका केली. मात्र, या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना आमदार संजय गायकवाड यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना स्पष्ट सुनावलं आहे. ते वडेट्टीवार, वैभव नाईक व त्या मुंबईच्या महापौर बाईंनी जास्त चभरेपणा करु नये. मी माझ्या पक्षाबद्दल नाही तर तुमच्या पक्षाबद्दल बोलत होतो असे गायकवाड म्हणाले.

शिवसेना ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके यांनी 70 कोटी रुपये खर्च केल्याचाही संजय गायकवाडांचा आरोप

बुलढाणा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना शरद पवारांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांनी असा खर्च केल्याचाही त्यांनी सांगितलं. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके यांनी 70 कोटी रुपये खर्च केल्याचाही आरोप संजय गायकवाड यांनी नाव न घेता केला. 

काय म्हणाले होते संजय गायकवाड?

डिसेंबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत असून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एकत्र लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचं वक्तव्य केलंय. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन-तीन कोटीपर्यंत खर्च होतो, असे म्हणत त्यांनी निवडणुकीचा खर्चच सांगितला आहे. बुलढाणा येथे बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, आम्ही शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप-शिवसेना युती पाहिजे आहे. ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आम्ही विधानसभेला युती करतो. लोकसभेला युती करतो आणि ज्या वेळेस छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते त्यावेळेस त्यांना आपण वाऱ्यावर सोडतो. त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचे आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Gaikwad : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन-तीन कोटी खर्च होतो, 100 बोकडं दिली जातात; संजय गायकवाडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ATC Action: ऐन दिवाळीच्या धामधूमीत महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई! झारखंड सरकारने 10 लाखांचं बक्षीस ठेवलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला डोंबिवलीतून उचलला
ऐन दिवाळीच्या धामधूमीत महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई! झारखंड सरकारने 10 लाखांचं बक्षीस ठेवलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला डोंबिवलीतून उचलला
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Nagpur Teacher Death : माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवणे ठरले जीवघेणे; नागपुरातील शिक्षकाचा मध्यप्रदेशातील पचमढीच्या दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू
माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवणे ठरले जीवघेणे; नागपुरातील शिक्षकाचा मध्यप्रदेशातील पचमढीच्या दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू
MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Embed widget