एक्स्प्लोर
Advertisement
अस्मिता योजनेत ग्रामीण महिलांना 5 रुपयांत सॅनिटरी नॅपकिन
मासिक पाळीच्या काळात तरुणींना स्वच्छता बाळगण्यास मदत व्हावी, या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला निर्णय ग्रामीण भागातील तरुणींसाठी दिलासादायक आहे.
मुंबई : एकीकडे सॅनटरी नॅपकिनवरचा जीएसटी कमी करण्याची मागणी होत आहे, अक्षयकुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस सरकारने ग्रामीण भागातील महिला-तरुणींसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्यासाठी अस्मिता योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात तरुणींमध्ये मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागृती व्हावी, यासाठी मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा मुहूर्त साधत येत्या 8 मार्चपासून ही योजना लागू होईल.
राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणिवा विकसित व्हाव्यात, यासाठी त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 60 पैशाला एक या हिशेबाने पाच रुपयांना आठ सॅनिटरी नॅपकिन्सचा पॅक उपलब्ध करुन देण्यात येईल.
सॅनिटरी नॅपकिनचा वापर 17 टक्क्यांवरुन 70 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतून महिला बचतगटांना रोजगारही मिळेल आणि ग्रामीण भागातील महिला आणि मुलींच्या आरोग्याचा प्रश्नही निकाली निघेल, असा दुहेरी फायदा साध्य होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'पॅडमॅन' हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. ग्रामीण महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्यासाठी झटणाऱ्या अरुणाचल मुरुगंथम यांची कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
मासिक पाळीच्या काळात तरुणींना स्वच्छता बाळगण्यास मदत व्हावी, या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला निर्णय ग्रामीण भागातील तरुणींसाठी दिलासादायक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement