एक्स्प्लोर

सांगली: जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात राडा, निविदेच्या वादातून हाणामारी

Sangli News : भाजपच्या सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या शासकीय बंगल्यावर सोमवारी रात्री जोरदार राडा झाला.

Sangli News : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या सांगलीतील निवासस्थानी राडा झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका निविदेच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या पतीने ही तक्रार दाखल केली आहे. मात्र,  मंगळवारी सकाळी ही तक्रार मागे घेण्यात आल्याने दोन गटातील वादावर पडदा पडला असल्याची चर्चा सुरू आहे. 

आरोच्या निविदेवरून दोन गटात  वाद झाल्याची चर्चा आहे. निविदेवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून हाणामारी आणि तोडफोड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांचे पती नंदू कोरे, कुटुंबातील अन्य आणि जिल्हा परिषद सभापती आणि काही सदस्यांमध्ये वाद झाला.  जिल्हा परिषद अध्यक्षाच्या  निवासस्थानात दारू पिऊन येऊन सभापती आणि काही सदस्यांनी मला आणि माझ्या भावास मारहाण केल्याचा आरोप नंदू कोरे यांनी केला. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या  निवासस्थानाततील खुर्च्या, कुंड्याची देखील तोडफोड करण्यात आली. 

या तोडफोड प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती भाजपचे प्रमोद शेंडगे, भाजपच्या महिला बाल कल्याण सभापती सुनिता पवार यांचे पती सुनील पवार, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील यांचे पती  सुनील पाटील, भाजपचे अरुण बालटे, अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तर, प्रमोद शेंडगे यांनी आरोप फेटाळून लावत आम्हालाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे पती आणि दीर यांनी मारहाण केली असल्याचा आरोप केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget