आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली नवी कोरी Bolero
सांगलीच्या 'मिनी जिप्सी' बनवणाऱ्या रॅन्चोची आनंद महिंद्रांनी दखल घेतली आहे. गाडीचं कौतुक आनंद महिंद्रा यांनी केलं असून त्यांनी या बदल्यात Bolero गाडी दिली आहे.
![आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली नवी कोरी Bolero Maharashtra sangli Anand Mahindra keeps his word Sangli dattatray lohar gets new Bolero in exchange for Mini Gypsy आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली नवी कोरी Bolero](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/24/5c065e5948d47e4ae7b7683532ce3b6a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहारला मिनी जिप्सीच्या बदल्यात नवीकोरी बोलेरो गाडी भेट मिळाली आहे. यामुळे दत्तात्रय लोहारचे दारात मोठी चारचाकी असण्याचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरल आहे. मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दत्तात्रय यांना आपली मिनी जिप्सी कुणालाही देणार नाही हा हट्ट सोडावा लागलाय. महिंद्रा कंपनीने दत्तात्रय लोहार यांची मिनी जिप्सी स्वतःच्या ताब्यात घेत नवीकोरी बोलेरो गाडी दत्तात्रय लोहार यांच्याकडे सुपूर्त केली. ही गाडी देताना यावेळी दत्तात्रय यांच्या पत्नी, आई आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रयची गाडी पाहत त्याचे कौतुक करत मिनी जिप्सीच्या बदल्यात नवी बोलेरो गाडी त्याला भेट देण्याचे ट्विटच्या माध्यमातून दिले आश्वासन दिले होते. मात्र दत्तात्रय आपण बनवलेली ही गाडी आपलीलक्ष्मी आहे असं म्हणत आपण ही गाडी देणार नसल्याचे म्हंटले होते .मात्र त्याचा हा विचार बदलला आणि दत्तात्रय लोहार यांनी स्वतः बनवलेली मिनी जिप्सी महिंद्रा ग्रुपच्या ताब्यात देत नवीकोरी बोलेरो गाडी भेट घेतली.
सांगलीच्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टापायी त्यांच्या कल्पकतेने गाडी बनवली. बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी चक्क बोलेरो देतो असे ट्विट केले. आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्त केली आहे.दत्तात्रयने त्याची मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला. यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत.
Local authorities will sooner or later stop him from plying the vehicle since it flouts regulations. I’ll personally offer him a Bolero in exchange. His creation can be displayed at MahindraResearchValley to inspire us, since ‘resourcefulness’ means doing more with less resources https://t.co/mibZTGjMPp
— anand mahindra (@anandmahindra) December 22, 2021
दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली होती. आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रयने गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले होते. त्यांना कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली होती. दत्तात्रय लोहार याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे..फॅब्रिकेशनचा त्याचा व्यवसाय आहे ते कामही त्याने फॅब्रिकेशन दुकानात बघून शिकला आहे. मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक झाले होते. आज त्यानी मिनी जिप्सीच्या बदल्यात नवीकोरी बोलेरो गाडी भेट मिळवली आहे.
संबंधित बातम्या :
देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांच्या मिनी जिप्सीचा गीतातून जागर, सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी रचले गीत
सांगलीच्या 'मिनी जिप्सी' बनवणाऱ्या रॅन्चोची आनंद महिंद्रांकडून दखल, दत्तात्रय लोहारांना Boleroची ऑफर
सांगलीतील रॅन्चोची महाराष्ट्रभर चर्चा; दत्तात्रय लोहारांनी बनवली 'मिनी जिप्सी'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)