एक्स्प्लोर

Nana Patole : नाना पटोलेंना ते वक्तव्य भोवण्याची चिन्हं, भाजप युवा मोर्चाची पटोलेंविरोधात कोर्टात याचिका

पंतप्रधानांविरोधात वारंवार करत असलेल्या अवमानकारक वक्तव्य नाना पटोलेंना भोवण्याची चिन्हं आहेत. आता शिवडी कोर्टात नाना पटोलेंविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार करण्यात आली आहे. 

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केल्याच्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीनं मुंबई न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले आहेत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात नाना पटोले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली असून कलम 153 बी, 500, 504, 505(2), 506 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

न्यायालयानं तेजिंदर सिंग तिवाना यांच्या याचिकेवर 28 जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. पंतप्रधान हे देशातील घटनात्मक पद आहे आणि या पदाचा अपमान करणं हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या  वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आपला निषेध व्यक्त केला आहे. 

मुंबईत भाजपतर्फे 18 जानेवारी रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन केलं गेलं आणि याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की, याप्रकरणी चौकशी करून कारवाई करू मात्र अद्याप राज्यात कुठेही गुन्हा नोंदवला गेलेला नाही. त्यामुळे अखेर भाजप युवा मोर्चातर्फे न्यायालयाचा दरवाजा ठोठावला गेला आहे.

भंडाऱ्यात मोदींबद्दल एक वक्तव्य करुन वाद ओढवून घेतलेल्या नाना पटोलेंनी मोदी नाव वापरत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नाना पटोलेंकडून मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे. "ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं", असं वक्तव्य केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पुन्हा वादात सापडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल नाना पटोले यांना विचारलं असता नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान, नाना पटोले यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी  येथे सुरू असलेल्या काँग्रेस (Congress) प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली होती. मात्र, जाता-जाता पुन्हा एकदा त्यांनी आणखी एका वादाला तोंड फोडलं आहे. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Form Details : निवडणूक अर्ज कसा भरायचा? जिल्हाधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं SambhajinagarVidhan Sabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : Maharashtra Assembly Election 2024 : 8 PmUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हस्ते Rajan Salvi , Vaibhav Naik यांना एबी फॉर्मVishva Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून राज्यात 25 हून अधिक ठिकाणी संत संमेलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
Embed widget