सांगली महापालिकेच्या महापौर निवडीत ट्विस्ट, भाजपचे 7 नगरसेवक नॉट रिचेबल
सांगली महापालिकेच्या विद्यमान महापौरांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपत आहे. दरम्यान आता नव्या महापौर, उपमहापौर निवडीत घोडेबाजार तेजीत आहे. भाजपचे 7 ही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने भाजपची चिंता वाढली आहे तर काँग्रेसचे 9 नगरसेवक महापौरपदाच्या उमेदवारीवरून नाराज असल्याची माहिती आहे.
सांगली : भाजपची सत्ता असलेल्या सांगली महापालिकेच्या विद्यमान महापौरांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपत आहे. दरम्यान आता नव्या महापौर, उपमहापौर निवडीत घोडेबाजार तेजीत आहे. यातच भाजपचे 7 नगरसेवक अजूनही भाजपच्या संपर्कात नाहीत. भाजपचे 7 ही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने भाजपची चिंता वाढली आहे तर काँग्रेसचे 9 नगरसेवक महापौरपदाच्या उमेदवारीवरून नाराज असल्याची माहिती आहे. 9 नगरसेवकांकडून दबाव गट तयात करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी सत्तेचा फॉर्म्युला ठरवावा अशी मागणी केली आहे.
भाजपची सत्ता असलेल्या सांगली महापालिकेच्या विद्यमान महापौरांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपली आहे. आता 23 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवड प्रकिया पार पडणार असून काँग्रेस -राष्ट्रवादी कडून भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची आताची महापौर -उपमहापौर निवडणूक चुरशीच्या वळणावर पोचली आहे.
भाजपचे 7 ही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने भाजपची चिंता वाढली आहे. भाजपकडून मात्र सर्व 43 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी भाजपची सत्ता उलथवणार का? अशी चर्चा आहे. भाजपच्या नगरसेवकांत नाराजी आहे. त्याचा फायदा काँगेस-राष्ट्रवादी मिळून आम्ही उठवू आणि भाजपची सत्ता उलटवून टाकून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष भाजप पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या निवडीत लक्ष घालत महापालिका मधील सत्ता काबीज करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. भाजपकडून मात्र सर्व 43 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी कडून भाजपची सत्ता काढून महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचे मनसुबे सुरू आहेत. भाजपच्या आताच्या कार्यपद्धतीवर नागरिकांची नाराजी आहे. तसेच भाजपच्या काही नगरसेवकात नाराजी आहे. त्याचा फायदा काँगेस-राष्ट्रवादी मिळून आम्ही उठवू आणि भाजपची सत्ता उलटवून टाकू, असं काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत.
सांगली महापालिकेतील बलाबल
सत्ताधारी भाजपचे संख्याबळ - 43 काँग्रेस- 19 राष्ट्रवादी - 15 बहुमतासाठी 39 नगरसेवकांची गरज