एक्स्प्लोर

विनापरवाना प्रचार पदयात्रा, चंद्रहार पाटलांसह समर्थकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

सांगली लोकसभेचे (Sangli Loksabha) उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्यासह समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झालाय. विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यामुळं गुन्हा दाखल झालाय.

Sangli loksabha Chandrahar Patil : महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे (Sangli Loksabha) उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्यासह समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यामुळं हा गुन्हा दाखल झालाय. चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात विनापरवाना प्रचार फेरी काढली होती.  त्यानंतर पाटील यांच्यासह 2 ते 3 समर्थक  कार्यकर्त्यांवर गुन्हा आचारसंहिता भंगाचा दाखल करण्यात आलाय.

 प्रचार पदयात्रा काढण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही

24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30  या वेळेत खटाव, बेडग गावात  मतदारांच्या गाठीभेटी घेऊन  लोकसभा  निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील यांनी प्रचार पदयात्रा काढली होती. मात्र, ही प्रचार पदयात्रा काढण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळं पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळं त्यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच निवडणूक आयोगाकडून नियमावाली प्रसिद्ध करण्यात येते. यामध्ये आचारसंहितेसंदर्भात काही नियम असतात. त्या नियमांचे निवडणुकीच्या काळात पालन करणं प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक असते. मात्र, नियमांचा भंग केल्यास कारवाई होते. 

सांगली लोकसभेतील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात 

सांगली लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीनं त्यांना उमेदवारी दिल्यामुळं सांगली काँग्रेसचे नेते नाराज आहे. कारण विशाल पाटील यांना तिकीट मिळावं यासाठी काँग्रेस नेते आग्रही होते. मात्र, त्यांना तिकीट मिळालं नाही. अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं सांगली लोकसभेत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभेतील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PMAditi Tatkare on Ladki Bahin Yojna | उद्या लाडक्या बहि‍णींचा हप्ता जमा होणार- आदिती तटकरेABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 07 March 2025Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
Embed widget