Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला!
सांगलीत आज मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगलीमधील जागेवरून कसा काथ्याकूट झाला, तसेच कशी आपल्या पदरी पडली नाही याबाबत कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
![Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला! Nana Patole has said that he suffered more than the Congress workers suffered due to not getting the Sangli Lok Sabha seat Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/8795e89c1dc4fc5c2312daedf1d042751714039693730736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना जितका त्रास झाला, त्यापेक्षा जास्त मला त्रास झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. सांगलीत आज काँग्रेसकडून मेळावा आोयजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगलीमधील जागेवरून कसा काथ्याकूट झाला, तसेच जागा आपल्या पदरी पडली नाही याबाबत कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच सांगलीला मशाल पेटवावी लागेल, अशी भावना व्यक्त केली.
आमदार विश्वजीत कदम यांनी सडेतोड भूमिका मांडत गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करूनही जागा काँग्रेसच्या वाट्याला न आल्याने पक्ष नेतृत्वासमोर जाहीर नाराजी बोलून दाखवली. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या सर्वांसमोर विश्वजीत कदम यांनी जागा न मिळाल्याची खंत व्यक्त केली.
या मेळाव्याला संबोधन करताना नाना पटोले यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की काँग्रेस कार्यकर्त्यांना जितका त्रास झाला, त्यापेक्षा जास्त मला त्रास सांगलीच्या जागेवरून झाला. त्यामुळे सांगली काँग्रेसला दृष्ट ज्यांनी लावली ती उतरल्याशिवाय राहणार नाही. एका षड्यंत्रामध्ये नाना फसला गेल्या असून परत फसणार नाही. काँग्रेस नेते कार्यकर्त्यांना ज्या वेदना होत आहेत त्यांना भेटून न्याय देण्याचा प्रयत्न करेन असेही नाना पाटोले यांनी सांगितले. नाना पाटील यांच्या भाषणांनंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. जिल्ह्यातील एका नेत्याच्या विकृतीमुळे अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शेवटी शेवटी काही तरी चुकलं असल्याचे मित्र पक्षाला समजले
दरम्यान, मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इतर जिल्ह्यातून पाच ते सहा नावे येत असताना फक्त सांगलीतून लोकसभा उमेदवारीसाठी एकच नाव समोर आले होते. तथापि, नंतर बरेच राजकारण झाले. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात तीन पक्षाशी आघाडी झाली. सांगलीच्या जागेबाबत राजकारण झाले याबाबत आपण जाणार नाही. सांगलीची जागा परंपरागत असून मागील वेळी असेच काही राजकारण झाले. उमेदवारी मिळाली पण चिन्ह मिळाले नाही. सांगलीबाबत काँग्रेस पक्षात कोणाचा वाद नव्हता.
शेवटी शेवटी काहीतरी चुकले आहे हे मित्र पक्षाला समजले आणि मगविधानपरिषद घ्या, आमच्या कोट्यातील घ्या अशा ऑफर येऊ लागल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कधी कधी विजय पराभव होत असतो. सांगली लोकसभेचा तिढा काही सुटला नाही, त्यामागील कारण हळूहळू समोर येईल. ज्या जागा निवडून येतील अशा जागा घ्या असे आम्ही म्हणत होतो त्यामध्ये एक नंबर सांगलीची जागा होती. मात्र, जो वाटा दोन पक्षाच्या आघाडीत मिळणार होता तीन पक्षात मिळणार नव्हता. संख्येपेक्षा ज्या जागा निवडून येतील अशा घ्या, असा आमचा आग्रह होता, यामध्ये सांगली पहिल्या नंबरवर होती. मात्र, मित्र पक्षाने हट्ट सोडला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सांगलीचा प्रश्न सुटला नाही. पर्याय दिला गेला तो सुद्धा पर्याय मान्य झाला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)