एक्स्प्लोर

कडेगावच्या आजोबांची कमाल... नातीचं ग्रँड स्वागत! पुण्याहून गावी आणायला पाठवलं हेलिकॉप्टर 

Sangli news Updates : सांगलीतील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्दच्या अशोक जाधव या आजोबांनी आपल्या नातीचे गावी ग्रँड स्वागत केल्याची जिल्हाभर चर्चा आहे.

Sangli news Updates : मुलगी जन्माला आल्याने अनेकजण नाराज होतात. परंतु कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्दच्या अशोक जाधव या आजोबांनी आपल्या नातीचे गावी ग्रँड स्वागत केलेय. पुण्याहून त्यांची नात हिंगणगाव खुर्द या गावी चक्क हेलिकॉप्टरने आली.  हिंगणगाव खुर्दचे सरपंच असलेल्या अशोक जाधव यांनी आपल्या नातीचे स्वागत चक्क हेलिकॉप्टरने केले. पुणे ते हिंगणगाव खुर्द या मूळ गावापर्यंत त्यांनी आपल्या नातीला हवाई प्रवास घडवत गावी धुमधडाक्यात स्वागत केले. हा कार्यक्रम बघण्यासाठी या परिसरातील लोकांसह अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील कलाकारही याठिकाणी उपस्थित होती. अशोक जाधव यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीवर प्रेम करुन मुली, महिलांविषयी कसा आदर बाळगावा हे या कार्यक्रमातून दाखवून दिलं आहे. 

कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील सरपंच अशोक जाधव यांच्या एकुलत्या एक कन्या स्नेहा यांना कन्यारत्न झाले. या चिमुकल्या नातीला त्यांनी पुण्याहून चक्क हेलिकॉप्टरने आजोळी घरी आणलं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत भव्य आणि अनोख्या पद्धतीने केलं. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वांगी येथील क्रीडा संकुलाच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरले आणि अशोक जाधव यांच्यासह जाधव कुटुंबीयांनी आपल्या नातीचे स्वागत व मुलगी जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला. 

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या समाजाला अशोक जाधव यांनी काही वर्षांपूर्वीच आदर्श घालून दिला आहे. अशोक जाधव यांना स्नेहा ही एकच मुलगी आहे. या मुलीचा विवाह 27 नोव्हेंबर 2020 रोजी कुंडल येथील स्वतंत्र सेनानी स्व.कॅप्टन रामचंद्र लाड यांचे नातू दिग्विजय लाड यांच्याशी झाला. स्नेहा आणि  दिग्विजय यांना 29 मार्च 2022 रोजी  कन्यारत्न  झाले. 

अशोक जाधव आणि त्यांच्या पत्नी उषा यांना नात झाल्याची बातमी कळताच आनंद झाला. आजी-आजोबांनी आपल्या नातीचे भव्य स्वागत करायचे ठरवले. त्याप्रमाणे नातीचं अर्थात मुलीच्या जन्माचं स्वागत इतक्या भव्यतेनं करण्यात आलं की सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून केल्याच्या घटनाही ऐकल्या आहेत; पण इथे मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वापरलं आणि मुलगी जन्माचा आनंद साजरा केला. 

अशोक जाधव यांनी नातीच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर स्वागत कमानी उभारून फुलांची उधळण देखील केली होती. ज्यावेळी आई आणि मुलगी 'हेलिकॉप्टर'मधून उतरले त्यावेळी त्यांचे पुष्पहार आणि हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलीच्या आजोबांनी बाळाला हेलिकॉप्टरमधून खाली घेतले आणि मोठ्या आनंदाने तिला आपल्या मिठीत घेतले. “आम्ही मुलीचा जन्म उत्सव  साजरा करत आहोत. हा जीवनाचा उत्सव आहे,” असे अशोक जाधव यांनी सांगितले. यावेळी  बँड आणि झांज पथकाच्या निनादात भव्य मिरवणूकही काढण्यात आली.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget