एक्स्प्लोर
सांगलीत मुख्यमंत्री फडणवीसांचं हेलिकॉप्टर भरकटलं
हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चकरा मारत होतं.
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना पुन्हा समोर आली आहे. सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा आटपून कोल्हापुरातील कोडोलीला जाताना हेलिकॉप्टरने काही काळासाठी दिशा भरकटलं होतं.
हेलिकॉप्टर भरकटलं त्यावेळी मुख्यमंत्र्यासोबत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होते. यावेळी देशमुख यांनी स्वतः पायलटला त्या परिसरचा अंदाज घेत हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यास मदत केली.
पृथ्वीराज देशमुख यांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला असून 8-9 मिनिटं हेलिकॉप्टर कोल्हापूर शहराभोवती घिरट्या घालत असल्याचंही देशमुखांनी सांगितलं.
सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर होते. सलग चार तास मॅरेथान बैठका घेतल्यानंतर ते दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सांगलीतील कवलापूरच्या मैदानातून कोल्हापुरातील कोडोलीत आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी निघाले होते.
हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चकरा मारत होतं. त्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी कोडोलीची दिशा पायलटला दिली. ते वारणा येथील हेलिपॅडवर उतरले. त्यामुळे नियोजित वेळपेक्षा अर्धातास उशिरा कार्यक्रमस्थळी पोहचले.
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आज सांगलीत देखील सुरक्षितता म्हणून शहरात हेलिपॅड न उभारता शहरापासून लांब कवलापूर विमानतळाच्या जागेवर मोकळ्या पटांगणावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. मात्र कोल्हापूरकडे जात असताना हेलिपॅडचा अक्षांश-रेखांश न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर दिशा चुकले आणि या घटनेने यंत्रणेची तारंबळ उडाली.
मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टरचं विघ्न
लातूर - 25 मे 2017
लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंकतर काही क्षणातच कोसळलं.
अलिबाग - 7 जुलै 2017
हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला
नाशिक - 9 डिसेंबर 2017
हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं
भाईंदर - 11 जानेवारी 2018
हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने लँडिंग होणाऱ्या हेलिकॉप्टरने पुन्हा टेक ऑफ केलं.
सांगली - 24 ऑक्टोबर 2018
हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चकरा मारत होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement