एक्स्प्लोर
महापौर निवडीपूर्वी सांगलीच्या भाजप नगरसेवकांचा जीवाचा गोवा
महापौर व उपमहापौर निवडीपूर्वी नगरसेवकांमध्ये फूट पडू नये याची खबरदारी घेण्यासाठी सर्व 42 नगरसेवकांना सध्या गोव्यात आणून ठेवण्यात आले आहे.
पणजी : सांगलीत महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 42 उमेदवार निवडून आले आहेत. महापौर व उपमहापौर निवडीपूर्वी नगरसेवकांमध्ये फूट पडू नये याची खबरदारी घेण्यासाठी सर्व 42 नगरसेवकांना सध्या गोव्यात आणून ठेवण्यात आले आहे. बहुतेक नगरसेवक सहकुटूंब व काही प्रमुख भाजपाकार्यकर्त्यां सोबत गोव्यात मुक्कामाला आहेत.
गोव्यातील हॉटेलमध्ये गेले दोन दिवस सर्व नगरसेवक आहेत. त्यांनी शुक्रवारी भाजपच्या पणजीतील कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यसंस्काराचे वृत्त पाहिले. त्यानंतर भाजपच्या कार्यालयात या सर्व नगरसेवकांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.
सोमवारी महापौर व उपमहापौर निवड आहे. त्यामुळे उद्या रविवारी हे सगळे नगरसेवक गोव्याचा निरोप घेतील. गोव्यात त्यांना सुरक्षितस्थळी ठेवले गेले आहे.
गोव्यात आलेले नगरसेवक सहकुटूंब येथील समुद्रकिनाऱ्यांसह अन्य पर्यटन स्थळांचा आस्वाद घेत आहेत.
महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत. दोन्ही पदांवर भाजपला आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत.मतदानापूर्वी जीवाचा गोवा करणारे भाजपचे सगळे नगरसेवक थेट मतदानासाठीच सांगलीमध्ये पोहचतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement