एक्स्प्लोर
सांगलीत पत्नीची पतीला लाकडी दांडक्याने मारहाण, पतीचा मृत्यू
सोमणा पुजारी दररोज दारु पिऊन घरी येऊन पत्नीशी भांडत होता.
सांगली : दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीत घडली आहे. या हत्येप्रकरणी उमदी पोलिसांनी नागवा पुजारी या महिलेला अटक केली आहे. सोमणा पुजारी असं मृत पतीचं नाव असून तो 55 वर्षांचा होता.
जत तालुक्यातील सोन्याळ इथल्या लकडेवाडीमध्ये सोमणा पुजारी यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याचा जोराचा फटका बसल्याने मृत्यू झाला. पत्नी नागवा पुजारीच्या मारहाणी त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
सोमणा पुजारी दररोज दारु पिऊन घरी येऊन पत्नीशी भांडत होता. सोमणा पुजारी काल (26 जून) दारु पिऊन घरी आला असता त्याची पत्नीसोबत वादावादी झाली. याचवेळी पत्नीने शेजारी असलेली काठी घेऊन पतीला मारलं आणि शेजारी राहणाऱ्या आपल्या भावकीतील घरी निघून गेली. थोड्या वेळाने परत येऊन पाहिल्यानंतर पती त्याच ठिकाणी पडून होता. नंतर सोमणा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आलं.
यानंतर उमदी पोलिसांनी या प्रकरणी पत्नी नागवाविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुजारी यांचा मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. मुलगा पत्नी आणि मुलासह कर्नाटकमधील तिकोटा इथे रोजंदारीवर जातात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
Advertisement