Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील अपघातांवर विधानसभेत चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक
Samruddhi Highway Accident : बुलढाण्यामध्ये समृद्धी महामर्गावर झालेल्या अपघातावर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा करण्यात आली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच्या उत्तराला मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले आहे.
Assembly Monsoon Session : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) चर्चा सुरु असताना यामध्ये 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी सभागृहाला दिली आहे. तर आता सर्व वाहनांची तपासणी करुनच वाहनांना समृद्धी महामार्गावार प्रवेश देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'बस चालकाने मद्य प्राशन केलं होतं', ही बाब देखील दादा भुसे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे. विधानसभेत विरोधकांकडून समृद्धी महामार्गावरील अपघातांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरलं. तसेच सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांना चोख उत्तर दिलं आहे.
सर्व वाहनांचे प्रबोधन करण्यात येणार : दादा भुसे
दरम्यान या महामार्गावर सर्व वाहनांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे. तर मद्यपानाची चाचणी करुनच चालकाला आणि वाहनांना महामर्गावर प्रवेश देण्यात येत असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे. सध्या समृद्धी महामार्गवार 370 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असल्याची माहिती देखील मंत्री दादा भुसे यांनी सभागृहाला दिली आहे. तर अपघातांची संख्या कमी कशी करण्यात येईल असे प्रयत्न देखील शासनाकडून सुरु आहेत, असं दादा भुसे म्हणाले आहेत.
प्रमुख अपघातांची कारणे देखील दादा भुसे यांनी सभागृहात सांगितली. तर समृद्धी महार्गावरील वेग मर्यादा देखील सभागृहात सांगण्यात आली आहे. यामध्ये लहान गाड्यानं 120 ची वेगमर्यादा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांना 100 किमीची वेगमर्यादा देण्यात आल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या दृष्टीकोनातून समृद्धी महामार्ग हा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचं सांगण्यात आलं. तर हा प्रकल्प आता पूर्णत्वाला जात असून यामुळे वेळेची बचत होत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. या महामार्गावर येताना गाडीचे टायर, गाडी चालकाची मद्यपानाची तपासणी यांसाख्या गोष्टी तपासण्यात येत आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
तज्ज्ञांकडून उपाययोजनांचा अभ्यास
समृ्द्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. अनेक स्वच्छतागृह, उपहारगृह यांची योजना समृद्धी महामार्गावर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यासाठी तज्ज्ञांचे देखील मार्गदर्शन होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
यावर शासन काय उपाययोजना करणार आहे असा थेट सवाल काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तर आम्हाला अपघात कसे झाले यावर स्पष्टीकरण नको तर यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येणार याची माहिती द्यावी असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा :