एक्स्प्लोर
दहीहंडीत 'सैराट'ची टीम, आर्ची-परशाला पाहण्यासाठी तुफान गर्दी

पुणे : मुंबईसह देशभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यातही मोठ्या थाटात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 'सैराट'ची टीम या दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती. वारजेतल्या चंद्रकांत चौधरी यांच्या चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी आणि अरबाज हे सैराट चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. आर्ची, परशा, सल्या आणि लंगड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली. यावेळी चौघांनी सैराटच्या गाण्यांवर ठेकाही धरला. मी पहिल्यांदाच दहीहंडी पाहतेय आणि माझा उत्साह खूपच वाढलाय रिंकूने यावेळी सांगितलं. तर प्रेक्षकांचा उत्साह पाहून माझा उत्साह वाढला, तुमच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचल्याचं आकाशने सांगितलं. तसंच चाहत्यांच्या प्रेमामुळे आज इथे आहे, अशी भावना तानाजीने व्यक्ती केली.
आणखी वाचा























