एक्स्प्लोर

सदाभाऊंचं राजू शेट्टींना खरमरीत पत्र, अकाऊंटमध्ये अडीच लाख पाठवले

सांगली/मुंबई: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वडीलांच्या आजारपणावेळी खासदार राजू शेट्टींकडून घेतलेले अडीच लाख रुपये परत केले आहेत. सदाभाऊंचा मुलगा सागर खोत यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच सदाभाऊंच्या आईने सदाभाऊंना वडीलांच्या आजारपणावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठी मदत केल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजू शेट्टींनी सदाभाऊंना दिलेल्या अडीच लाखाच्या मदतीची बँकेची स्लिप सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळं राजू शेट्टींनी आठवण करुन देताच, सदाभाऊ खोत यांनी त्यांना अडीच लाख रुपये परत केले आहेत. त्यामुळं सदाभाऊ आणि राजू शेट्टींमध्ये केवळ मतभेदच नव्हे तर मनभेदही निर्माण झाल्याचं स्पष्ट होतं आहे. इतकंच नाही तर सदाभाऊ यांनी राजू शेट्टींना खरमरीत पत्र लिहून अडीच लाख परत करत असल्याचं म्हटलं आहे. सदाभाऊंनी राजू शेट्टींना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं प्रिय खा. राजु शेट्टी, मी माझे सगळे आयुष्य शेतकर्यांना न्याय मिळावा, त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात घालवला. मी माझ्या नेत्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलो...सम्माननीय राजू शेट्टी यांच्यात थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर ते ही बाब मान्य करतील. आंदोलनात आपल्या सहकार्याला केलेल्या मदतीचा उल्लेख नेत्याने करायचा नसतो. नाहितर नेता आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यात काय फरक राहील,डोक्यात हवा गेली की नेता बरळू लागतो. त्याचे नेतेपण विसरून मनाचा कोतेपणा दिसू लागतो. माझ्या वडिलांसाठी केलेल्या मदतीची जाहिर वाच्यता करून राजू शेट्टी यांनी सामाजिक संकेत पायदळी तुडवले असून आणि संघटनेचा नेता कसा नसावा याचे उदाहरण घालून दिले आहे. खरे तर यातून राजू शेट्टी यांच्याकडून मदत घेतांना संघटनेचा कार्यकर्ता आता दहादा विचार करेल. यातून संघटना विस्कळीत होण्याचा धोका मला दिसतो आहे. माझ्या वडिलांनी मला कर्जदाराच्या कर्जातून मुक्त होण्याचीच शिकवण दिली आहे. जो व्यक्ति केलेल्या मदतीची जाहिर वाच्यता करतो, त्याची मदत कधी घेऊ नको आणि घेतली तर ताबड़तोड़ ती परत कर, अशा व्यक्तीपासून दूर रहा, अशीही शिकवण मला वडिलांनी दिली आहे. Sadabhau Khot, Raju shetty या शिकवणीला अनुसरून मी राजू शेट्टी यांनी दिलेले अडीच लाख रूपये (रू. 2,50,000) परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम मी त्यांच्या बँक खात्यात RTGS ने जमा करत आहे. मी आज आपल्या ऋणातुन माझ्या बापाला मुक्त केला आहे. सदरची रक्कम मी माझ्या पगारातुन देवु केली आहे त्यांच्या जवळील उतावळी झालेले त्यांचे बगलबच्चे हे कोणत्या थराला संघटना घेऊन निघालेले आहेत, हे अंध झालेल्या नेत्याला कसे दिसणार? परंतु या चळवळीमध्ये अनेक जिवाभावाची माणसे मिळाली व त्यांनी भरभरुन प्रेम दिले. मी त्यांचा सदैव ऋणी राहील. खा. राजु शेट्टींना नेता मानत असताना मला कधीही कमी पणा वाटला नाही. परंतु आपल्या बगलबच्चांच्या मदतीने माझी प्रतिमा मलिन करण्याचा आटोकात प्रयत्न केला. त्याचे मला किंचीतही दुःख वाटले नाही. परंतू डोगंर माथ्यांच्या कुशित वसलेल माझ खेडेंगाव अशा गावात माझ्या बापाने मला मोठा केला.हे करत असताना मी माझ्या बापाचे कष्ट कदापीही विसरु शकत नाही. शेताभातामध्ये दिवस दिवसभर काम करणारा माझा बाप,12 बैलाच्या मागे दिवसभर नागंरण करणारा माझा बाप, दुसर्याच्या कामावर जाऊन हातामध्ये सुतकी घेऊन दगड फोडणारा माझा बाप,कधी अगांवरती सणावाराला नवं चिदूंक ही आलं नाही पण आम्हा भावंडा ला सावकाराच कर्ज काढुन नवा कपडां घेतला. घरी पहीले आम्ही भावंडे जेवायचो मग बाप जेवायचा. शेतकरी चळवळीतील आदोंलन सुरु झाली कि गावातल्या भोळ्या भाबड्या लोकांना घेऊन स्वतः आदोंलनात सुध्दा उतरायचे. माझ्या बापाला मी चळवळीत काम करतोय याचा मोठा अभिमान होता. कधीही त्यांनी मला घराकडे मागे वळून पाहू दिले नाही. माझा बाप दवाखाण्यात असताना सुध्दा त्यांनी मला शेवट पर्यंत साथ दिली व आत्महत्या करणार्या शेतकर्यासाठी त्यावेळी मृत्यूलाही सांगीतल माझा पोरगा यात्रा काढुन परत येऊ दे, मग मी तुझ्या बरोबर येईन. शेतकर्यासाठी मृत्यूहालाही आव्हान देणारा माझा बाप मी राजू शेट्टींच्या बगलबच्चाच्यां ऋणामध्ये कधीही ठेवणार नाही, इथून पुढे मी माझी लेखणी हिन,पाथळीच्या लोकांच्यासाठी चालवणार नाही. पण मला दुख:ने आर्वजुन म्हणावे लागते,जे काय बोलली असेल, तर ती माझी आई होती, तिच्या अतंकरणातले ते बोल होते. असे अनेकदा राजू शेट्टींची आई ही वेगवेगळ्या विषयावर बोलताना पाहीलेलं आहे, परंतू मला त्या आईच्या व माझ्या आई मध्ये फरक वाटला नाही. पंरतू माझ्या आई बद्दल राजू शेट्टी व त्यांच्या बगलबच्चांला का वेगळे वाटले? हे न उलगडणारे कोडे आहे ????शेतकर्यांचा मित्र आणि संघटनेचा छोटा कार्यकर्ता सदाभाऊ खोत????
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget