एक्स्प्लोर
मंत्रालयातील प्रवेशाबाबत पंकजा मुंडे म्हणतात...
मागील अनेक महिन्यांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. यादरम्यानच पंकजा मुंडेंनी नांदेडमध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेत हजेरी लावली होती.
मुंबई : "आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत, पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही’ या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असं वक्तव्य नव्हतं," असा दावा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत परत मंत्रालयात आम्ही प्रवेश करु शकणार नाही," असं जाहीर वचन देणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं होतं. याबाबत विचारलं असता, माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं त्यांनी म्हटलं.
पंकजा मुंडेंना रोखलं
दरम्यान, धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना आज मंत्रालयात प्रवेश करताना अडवलं. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मंत्रालयात प्रवेश करणार नाही असं जाहीर वक्तव्य पंकजा मुंडे यांनी नुकतंच केलं होतं. यासाठी आमदार वडकुते यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करताना पंकजा मुंडे यांना रोखलं.
याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या की, "आमदार रामराव वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा गेल्या 70 वर्षात जे धनगरांना आरक्षण देऊ शकले नाहीत त्यांना रोखावं. ते ज्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी धनगरांना आरक्षण का दिले नाही. जर मला रोखल्याने धनगर आरक्षण मिळणार असेल तर मला खुशाल रोखा."
...तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही : पंकजा मुंडे
मागील अनेक महिन्यांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. यादरम्यानच पंकजा मुंडेंनी नांदेडमध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेत हजेरी लावली होती. "मी पंकजा गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा मुंडे, आजच्या सभेत तुम्हाला जाहीर वचन देते की, धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणायचं आहे," असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, याचा विश्वास असल्याचं पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं होतं. परंतु आज मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला पंकजा मुंडेंनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोणत्या मुद्द्यांआधारे आरक्षणाची मागणी?
- बॉम्बे रजिस्ट्रेशन अक्टमध्ये 'धनगर' ऐवजी 'धनगड' असा उल्लेख
- प्रत्येक राज्यात उच्चार धनगर असो किंवा धनगड, अर्थ समान असल्याचा दावा
- वर्षानुवर्षे धनगरांचा मेंढीपालनाचा व्यवसाय
- नृत्य, गायन, देव-देवतांसंदर्भात धनगरांची खास संस्कृती
- मानववंश शास्त्र आणि सामाजिकदृष्ट्या धनगर भटकी जमात असल्याचा उल्लेख
- समाजाचा समावेश आदिवासी जमातीत का नाही, असा प्रश्न भटक्या विमुक्तांच्या अभ्यासकांनी केला
- बिहार आणि झारखंडमध्ये धनगरांचा समावेश आदिवासी जमातीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement