एक्स्प्लोर
दसरा मेळाव्याची रंगीत तालीम, संघाचे स्वयंसेवक फुल पँटमध्ये
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या पथसंचलनाशिवाय नागपूरचा दसरा पूर्णच होत नाही. मात्र यंदाच्या विजयादशमी सोहळ्यात तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक जरा वेगळ्या वेशात पाहायला मिळतील.
संघाची खाकी हाफ पँट इतिहासजमा झाली असून, यंदाच्या दसरा मेळाव्यात संघाचे कार्यकर्ते फुल पॅँटमध्ये पथसंचलन करणार आहेत. त्या पथसंचलनाची रंगीत तालीम रेशीमबाग मैदान घेण्यात आली.
संघामध्ये तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत स्वयंसेवकांचा गणवेश बदलण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी फुल पँट खरेदीसाठी गर्दी केली होती. विजयादशमी सोहळ्यापासून स्वयंसेवक
अधिकृतपणे नवे गणवेश परिधान केलेले दिसतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement