एक्स्प्लोर
संघ आरक्षण आणि घटनाविरोधी : प्रकाश आंबेडकर

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणविरोध आणि घटनाविरोधी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नागपुरात त्यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला, यावेळी संघावर त्यांनी हा आरोप केला.
अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. भारीप बहुजन महासंघाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या मोर्चाला पटवर्धन मैदानापासून सुरूवात झाली आणि मॉरिस कॉलेज जवळ मोर्चाची सांगता झाली. अॅट्रॉसिटी कायदा सक्षम करावा, दलितांवर होणारा अन्याय थांबवावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात भारिप बहुजन महासंघासहित सर्व कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















