Rohit Pawar Tweet: मग संघर्षाला घाबरतंय कोण?... गडी एकटा निघाला; राष्ट्रवादीतील फुटीवर रोहित पवारांच्या व्हिडीओने वेधलं लक्ष
Rohit Pawar Tweet On Sharad Pawar: 'गडी एकटना निघाला' असं गाणं असलेला एक व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी शरद पवारांच्या संघर्षाची कथा शेअर केली आहे.
![Rohit Pawar Tweet: मग संघर्षाला घाबरतंय कोण?... गडी एकटा निघाला; राष्ट्रवादीतील फुटीवर रोहित पवारांच्या व्हिडीओने वेधलं लक्ष rohit pawar tweet on sharad pawar ncp political crisis ajit pawar oath maharashtra latest news Rohit Pawar Tweet: मग संघर्षाला घाबरतंय कोण?... गडी एकटा निघाला; राष्ट्रवादीतील फुटीवर रोहित पवारांच्या व्हिडीओने वेधलं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/24cfa00312300c28c12aa32d8f376bda168830455093793_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राष्ट्रवादीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar Tweet On Sharad Pawar) एक व्हिडीओ शेअर करुन आलं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा' अशा आशयाचं एक व्हिडीओ ट्वीट आमदार रोहित पवारांनी केलं आहे. लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच आहे असंही त्यांनी म्हटलंय. आमदार रोहित पवारांनी या व्हिडीओतून शरद पवारांच्या संघर्षाची कथा शेअर केली असून तो व्हिडीओ चांगलाच व्हायलर होत आहे.
काय म्हटलंय रोहित पवारांनी?
वाट आहे संघर्षाची...
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा...
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...
वाट आहे संघर्षाची...
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2023
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा...
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच... pic.twitter.com/fORmLbW6tk
Rohit Pawar Shared Sharad Pawar's Video: रोहित पवार शरद पवारांच्या बाजूला
राज्यातील घडत असलेल्या घडामोडीवर, राष्ट्रवादीच्या फुटीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्या बाजूला बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे पवार घराण्यातील व्यक्ती असलेले रोहित पवार हे शरद पवारांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. 2019 सालच्या अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवेळीही रोहित पवारांनी लागोलाग सूचक प्रतिक्रिया देत आपण शरद पवारांच्या सोबत असल्याचं सांगितलं होतं. आताही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पवारांच्या संघर्षाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
गडी एकटा निघाला असं गाणं असलेला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारची भावनिक साद घातल्याचं सांगितल जातंय.
Jayant Patil On Ajit Pawar : मी साहेबांसोबत, जयंत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवारांच्या पाठिशी असताना आपण शरद पवारांच्या पाठिशी असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)