एक्स्प्लोर

कर्जत नगपंचायत, राम शिंदे ते अजित पवार, काळा शर्ट घालून रोहित पवारांची पत्रकार परिषद 

राम शिंदे (Ram Shinde)  यांना विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला. मी निवडून आलो हे अनेकजणांना पचत नाही असा टोला आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) राम शिंदेंना लगावला.

Rohit Pawar : राम शिंदे (Ram Shinde)  यांना विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला. मी निवडून आलो हे अनेकजणांना पचत नाही असा टोला आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) राम शिंदेंना लगावला. कर्जत नगर पंचायतमध्ये जे राजकारण सुरु आहे, हे मला राजकीय अडचणीत आणण्यासाठी केलं जात आहे. मला धक्का देण्यासाठी हे सगळं सुरु आहे. दबाव भीती अमिष दाखवून हे सगळं केलं जात असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

कर्जत नगर पंचायतमध्ये जी सत्ता होती ती आम्ही सर्वांनी मिळून 3 वर्षापूवी आणली होती. आम्ही आमच सरकार आणलं होतं.  त्यात सगळ्यात जास्त नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे होते, फक्त 2 भाजपच्या विचारचे होते. आताच्या नगराध्यक्षाच्या विरोधात त्यांनी एक पत्र दिलं होतं, अविश्वासाचा ठरव त्यांनी मांडला होता. 7 ला पत्र दिलं 8  तारखेला हे पत्र पुढं गेल आणि 9 तारखेला आदेश काढले की 16 तारखेला एक बैठक होईल आणि त्या बैठीत उषा राऊत यांना उत्तर द्यावं लागेल. त्यांना त्याचं म्हणणं मांडावं लागणार आहे. सगळी महिनाभराची  चौकशी होत असते. ती कलेक्टर घेत असतात पण इथ कायदा बदलला जात असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

 कर्जतबाबत राजकारण केलं  जात आहे

सरकारने याबाबत नवीन अध्यादेश काढला आहे. 15 तारखेला एक नवीन अध्यादेश काढण्यात आला आहे.  बैठक पुढे ढकलली आहे. नवीन अध्यादेशानुसार परत 21 ला बैठक घेणार आहोत. जिल्हाधिकारी आणि प्रांत यांना सोबत घेऊन राजकारण केलं जात आहे. याची बैठक कुठे झाली तर राम शिंदे याच्या कार्यालयात राजकीय बैठक झाली आहे. फक्त कर्जतबाबत राजकारण केलं  जात आहे. सरकार एमआयडीसीसाठी का काही करत नाही असा सवाल रोहित पवारांनी विचारला. 

पाण्यासाठी इतर विकासकामाचे अनेक प्रस्ताव पडून 

पाण्यासाठी इतर विकासकामाचे अनेक प्रस्ताव पडून आहेत. त्याच्यासाठी राम शिंदे काही करत नाहीत. कोर्टाकडूनही न्याय मिळू नये यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. कुरघोड्या काय लेव्हल पर्यंत करायच्या यातून दिसत आहे असे रोहित पवार म्हणाले. राम शिंदे यांनी काहीही करून ठरवले होते की माळी समाजाला धडा शिकवण्यासाठी हे केलं आहे. राजकीय भूमिका घेत येत नसताना हे सगळ केल्याचे रोहित पवार म्हणाले. आज राज्यात अनेक प्रश्न असताना एका नगरपरिषदेसाठी एवढी खटाटोप सुरु होती. हे सरकार राजकीय कुरघोड्या करत आहे का ?असा प्रश्न निर्माण होत असल्याचे रोहित पवार म्हणाले. अनेक काम स्वतः च्या पैशातून करुन सेवा दिली आहे. राम शिंदेंनी विकास निधी थांबवला आहे, विकासकामात अडचणी आणल्याचे रोहित पवार म्हणाले. 

बॅनर माझ्या मित्र परिवाराने लावलेत

दादाच्या स्वागताला अनेक कार्यकर्ते पत्र घेऊन गेले आहेत. अनेक कामे अपूर्ण आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीसाठी निधी हवा आहे. माझे लोक तहानलेले आहेत. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे. मी कॉपी करणार माणूस नाही. बॅनर रोहित पवार मित्र परिवार याने लावले आहेत. 0त्या मित्र परिवाराला मी शोधत आहे असे रोहित पवार म्हणाले. सामाजिक काम आहे. त्याच्या सोयीनुसार काम घेतलं आहे. दादा मतदारसंघात आले त्याचा आनंद आहे. दादांचा चार पाच दिवसात कार्यकम ठरला आहे. माझ्या आज वेगळ्या बैठका ठरल्या होत्या. त्यामुळं मी कर्जतला गेलो नाही असे रोहित पवार म्हणाले.

मराठी प्रथम बाकी सगळं नंतर

भगवानगड प्रेरणादायी स्थान आहे. संताच्या विचाराने चालणारे असतात ते काही बोलले असतील तर मला ऐकून घ्यावे लागेल. वाल्मिक कराड यांनी चुकीच्या घटना केल्या आहेत. त्यांचे मित्र धनंजय मुंडे आहेत. कोर्टात न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे असे रोहित पवार म्हणाले. मराठी प्रथम बाकी सगळं नंतर, सरकारला धाडस नाही केंद्रा विरोधात बोलायचे.आपल्याला सीबीएससी स्वीकारवे लागते, केंद्र सरकार जे लादत आहे ते स्वीकारावे असे सुरु आहे असे रोहित पवार म्हणाले. 

तीन चार लोक भुंकण्यासाठी ठेवले आहेत

तीन चार लोक भुंकण्यासाठी ठेवले आहेत. भाजपचे मोठे नेते या तीन चार लोकांच्या मागे आहेत. मोठे नेते यांना भुंकायला लावत आहेत, ते भुंकतात त्यांच्यावर जास्त बोलायला नको असे म्हणत रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. 

काँग्रेस नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, जे करायचे आहे ते लवकर करा, ज्यांना घ्यायचे त्यांना लवकर घ्या. बोट असते बोट भरली की डुबून जाते. अनेक भाजपमधील लोकांना मंत्रीपद काय मिळाले आपण पाहतो आहोत. आशिष शेलार, गिरीश महाजन यांना काय पद मिळाले आहे ते पाहा. संग्राम थोपटे विचारला पक्के आहेत. त्यांचे वडील पक्के आहेत. त्यांच्या चर्चा सुरु आहेत. भाजपला घ्यायचं असेल तर झाडून पुसून सगळं घेऊन जावा त्यामुळे नवीन लोकांना संधी देता येईल असे रोहित पवार म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

कर्जत जामखेड मतदारसंघात अजित दादांची एंट्री; राम शिंदेंच्या आरोपांच्या फैरी अन्  विधानसभा निवडणूक निकालानंतरचा पहिलाच दौरा  

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget