एक्स्प्लोर

Rohit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल : रोहित पवार

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखा व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल, असं वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं.

Rohit Pawar on Ajit Pawar :  अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखा व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल, असं वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. अजितदादांकडे असलेल्या अनुभवामुळं राज्यातील नागरीकांना योग्य वेळी निर्णय घेतल्याचा फायदा होईल असेही रोहित पावर यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आयोध्या दौऱ्यावर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोध्या दौरा करावा मात्र, त्यावरून राजकारण करु नये असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं.

सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी

अजित दादांसारखी व्यक्ती लगेच निर्णय घेऊ शकते. प्रशासनाला विश्वासात घेऊ शकते. महाराष्ट्रावर अडचण येईल तेव्हा राजकारणाचा विचार न करता अजित पवार पवार निर्णय घेतात असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी असे रोहित पवार म्हणाले. मागच्या वेळी राज्यात 110 टक्के पाऊस झाला तेव्हा विरोधक ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागमी करत होते. आता 126 टक्के पाऊस झाला असूनही ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरेंचं रोहित पवारांनी केलं स्वागत

भाजप आमदार आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट ट्विट केली होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, नोटांवर कुणाचा फोटो असावा यापेक्षा ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांना ओला दुष्काळ जाहीर करुन मदत मिळावी हा विषय महत्वाचा असल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. सध्या युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहे. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी रोहित पवारांनी त्यांचेही स्वागत केलं. 

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याकडं लक्ष घालावं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, याबाबत बोलताना त्यांनी आयोध्या दौरा करावा मात्र त्यावरून राजकारण करू नये असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्यांनी दिवाळी निमित्ताने जनतेशी संवाद साधला ठीक आहे, पण सरकारने जो आनंदाचा शिधा वाटला तो कुणापर्यंत पोहोचला कुणापर्यंत पोहोचला नाही हे पाहावं लागेल. सोबतच आज शेतकऱ्यांना हातामध्ये मदत पाहिजे आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे सरसकट पंचनामे व्हावेत, त्याकडं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असंही रोहित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Girish Mahajan : 'प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे', गिरीष महाजनांचा अजित पवार, एकनाथ खडसेंना टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Tafa Car Accident | केजमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ABP MajhaMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचं खातेवाटप जाहीर, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल ABP MajhaDeepak Kesarkar VS Aaditya Thackeray | शालेय गणवेशावरून आदित्य ठाकरे- केसरकरांमध्ये जुंपली ABP MajhaEVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Embed widget