एक्स्प्लोर
Advertisement
रोहिंग्यांना आश्रय देणं म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका : मोहन भागवत
रोहिंग्या समाजाला स्वत:चाच देश का सोडावा लागला. म्यानमारने रोहिंग्यांना देशातून का हाकललं?
नागपूर : विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना रोहिंग्या आपल्या देशासाठी धोकादायक असल्याचं म्हटलं. रोहिंग्या समाजाला स्वत:चाच देश का सोडावा लागला. म्यानमारने रोहिंग्यांना देशातून का हाकललं? रोहिंग्यांना माणुसकी दाखवून आश्रय देणं म्हणजे स्वत:चा विनाश ओढवून घेण्यासारखं असल्याचंही परखड मत भागवत यांनी व्यक्त केलं.
मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक
नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात शस्त्रपूजनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं. भागवत म्हणाले की, “दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. ज्या पद्धतीने सरकार दहशतवादी आणि सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबाराला उत्तर देत आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे.”
मागील काही महिन्यात सरकारने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना हाताळलं आहे, त्याचा सकारात्मक परिणा दिसत आहे. फुटीरतावाद्यांचे अवैध आर्थिक स्त्रोत नष्ट करुन सरकारने त्यांच्या कारवाया नियंत्रित केल्या आहेत.
मुंबईतील चेंगराचेंगरीवर दु:ख
भाषणाच्या सुरुवातीलाच मोहन भागवत यांनी मुंबईतील एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीवर दु:ख व्यक्त केलं. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींचं सांत्वन केलं. "जे घडलं त्यामुळे फार दु:ख झालं. पीडित कुटुंबांचं मी सांत्वन करतो. अशा घटना विसरुन आपल्याला पुढे जावंच लागतं," असं मोहन भागवत म्हणाले.
‘गोरक्षेचा हिंसेशी संबंध जोडू नका’
"गोरक्षेच्या मुद्द्यावर भागवत म्हणाले की, हा मुद्दा हिंसेशी जोडू नये. मुस्लीमही गोरक्षक आहेत आणि त्यांच्यावरही हल्ले झाले आहेत. गोरक्षेच्या नावावर हिंसा व्हायला नको. रक्षा आणि सतर्कता शब्दाचा काही लोकांनी दुरुपयोग केला आहे.
बरेच लोक गोतस्करांकडून मारले जात आहेत. धर्म बाजूला ठेवून आपल्याला गोरक्षेच्या मुद्द्याकडे पाहायला हवं. बऱ्याच मुस्लीमांनी गोरक्षेसाठी आपले प्राण गमावले आहेत. संविधानातही गायीच्या संरक्षणाचा उल्लेख आहे," असं सरसंघचालक म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ठाणे
विश्व
Advertisement