एक्स्प्लोर
परळीत धनंजय मुंडेंच्या गणपतीला आर्ची, परशाची हजेरी

बीडः 'सैराट' फेम आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी परळी वैजनाथ येथील गणपतीसाठी खास हजेरी लावली. दोघांच्या हस्ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं.
PHOTO: पाहा कार्यक्रमातील खास फोटो
परळी येथील नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवास आज पासून सुरुवात झाली. आर्ची आणि परशा यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. आर्ची आणि परश्याला पाहण्यासाठी तरुणाने मोठी गर्दी केली होती. धनंजय मुंडे अनेक वर्षांपासून नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचं आयोजन करतात. या सोहळ्यात 'सैराट'च्या गाण्यांवर तरुणाईने जोरदार ठेका धरला. यावेळी धनंजय मुंडेंच्या हस्ते आर्ची परशाचा सत्कार करण्यात आला.आणखी वाचा























