एक्स्प्लोर

मुंबई-पुणे हायपरलूप संदर्भात रिचर्ड ब्रॅन्सन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ब्रिटनचे उद्योग पती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (12 डिसेंबर) मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली. दहा अरब डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या योजनेसंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि नवीन सरकारला या प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी ही सदिच्छा भेट घेण्यात आली. देशभरामध्ये वेगवेगळे प्रकल्प सध्या नावारूपाला येत आहेत.

मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूपला जुलै २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून आधीच्या सरकारने मान्यता दिली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रकल्पाचा फेरविचार करण्याच्या तयारीत आहेत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. ब्रिटनचे उद्योग पती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (12 डिसेंबर) मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली. दहा अरब डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या योजनेसंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि नवीन सरकारला या प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी ही सदिच्छा भेट घेण्यात आली. देशभरामध्ये वेगवेगळे प्रकल्प सध्या नावारूपाला येत आहेत. त्यापैकी महत्वकांक्षी मुंबई-पुणे हाइपरलूप हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात मागील सरकार ज्या पद्धतीने सकारात्मक होतं त्याच पद्धतीने नवीन सरकारलाही याची माहिती देऊन त्यांनाही या प्रकल्पात सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यासाठी आजची ही भेट महत्त्वपूर्ण होती. या भेटीदरम्यान शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. काय आहे हायपरलूप? मुंबईहून पुणे गाठण्यासाठी रस्ता किंवा रेल्वेमार्गाने किमान तीन तास लागतातच. जवळपास दीडशे किलोमीटरचं हे अंतर भविष्यात अवघ्या 20 ते 25 मिनिटांत कापता येणार आहे. राज्य सरकारने पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोरसाठी अमेरिकास्थित व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (आशय पत्र) वर स्वाक्षरी केली आहे. पहिला हायपरलूप मार्ग मध्य पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 फेब्रुवारीला नवी मुंबई विमानतळाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी असणार आहे. प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. रिचर्ड ब्रॅन्सन यांनी कॅलिफोर्नियात व्हर्जिन हायपरलूप कंपनीची स्थापना केली. हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम काय आहे? दोन शहरांना जोडणाऱ्या भव्य ट्यूब्स बांधल्या जातात. (एक मुंबईकडे जाणारी, तर पुण्याच्या दिशेने) ट्रेनप्रमाणे स्पेशल कम्पार्टमेंट एका दिशेने दुसरीकडे प्रवास करतात. ठराविक अंतराने असलेल्या मॅग्नेटिक अॅक्सलरेटर्समुळे हे कम्पार्टमेंट पुढे सरकत राहतील. कम्पार्टमेंट भोवती हवेचा कमी दाब तयार करुन वेग वाढवला जाईल. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांचा वेग ताशी एक हजार किमी असेल, असं रिचर्ड ब्रॅन्सन यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात याच्या निम्म्या वेगाने प्रवास झाला, तरी दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ प्रचंड प्रमाणात वाचेल.मुंबईत पीक अवर्समधील ट्राफिक पाहता या वेळेत वांद्र्याहून सांताक्रुझ गाठायला जितका वेळ लागेल, तितकाच वेळ सांताक्रुझहून पुणे गाठायला लागू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवालChitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोलRaj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास, भाजप आमदारांनी प्रत फाडल्या; जम्मू काश्मीर विधानसभेत राडा
मोठी बातमी! कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास, भाजप आमदारांनी प्रत फाडल्या; जम्मू काश्मीर विधानसभेत राडा
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Embed widget