एक्स्प्लोर

खायला अन्न नसलेल्या गरीबाचाही विचार करण्याची गरज : गडकरी

जाती-धर्मावर नव्हे, तर जात आणि धर्म बाजूला ठेवून, जे अत्यंत गरीब आहेत, त्यांचाही काही विचार करायला पाहिजे, असं मत गडकरींनी व्यक्त केलं. गडकरी काल औरंगाबादेत बोलत होते.

औरंगाबाद : राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. जाती-धर्मावर नव्हे, तर जात आणि धर्म बाजूला ठेवून, जे अत्यंत गरीब आहेत, त्यांचाही काही विचार करायला पाहिजे, असं मत गडकरींनी व्यक्त केलं. गडकरी काल औरंगाबादेत बोलत होते.

आरक्षण जरी दिलं तरी नोकऱ्या कुठं आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, अशा आंदोलनात आगीत तेल ओतण्याचं काम जबाबदार पक्षांनी करु नये, असंही गडकरींनी आवाहन केलं.

तसेच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वाट काढतील, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधील मोठा मंत्री पहिल्यांदाच बोलल्याने गडकरींच्या या वक्तव्यावरुन आता चर्चेला सुरुवात झाली.

गडकरी नेमकं काय म्हणाले?

''गरीब गरीब असतो. गरीबाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते. धर्म कुठलाही असो, हिंदू असो, मुसलमान असो, मराठा असो.. एक क्लास असा आहे समाजात,  ज्याला अंगावर कपडे नाहीत, खायला अन्न नाही. त्यामुळे असा विचार आलाय की त्या समाजामध्ये, एकदम जो गरीब आहे, त्याचाही काही विचार केला पाहिजे..'', असं गडकरी म्हणाले.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनं करत आहे. औरंगबाद, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळणही लागलं होतं. तसेच आंदोलनाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

मराठा समाजाच्या मागण्यांचा राज्य सरकारही गंभीरतेने विचार करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला विनंती करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलवलं जाईल. अधिवेशनात या अहवालावर सर्वानुमते चर्चा केली जाईल आणि काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिलं आहे.

गडकरींचं स्पष्टीकरण

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या विधानाच्या बातम्या माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांनी (नितीन गडकरी) ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "जातीआधारित आरक्षण बदलून आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देण्याचा केंद्राचा कोणताही विचार नाही."

VIDEO : पाहा गडकरी नेमके काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget