![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Wardha Pattern: मविआत वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती! जास्त जागा जिंकण्यासाठी मोठा निर्णय, विधानसभेसाठी उमेदवारांची होणार देवाणघेवाण
Wardha Pattern: मविआच्या जागा वाटपात मतदारसंघ एका पक्षाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास मविआ करेल उमेदवारांची देवाण-घेवाण करण्याची शक्यता आहे.
![Wardha Pattern: मविआत वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती! जास्त जागा जिंकण्यासाठी मोठा निर्णय, विधानसभेसाठी उमेदवारांची होणार देवाणघेवाण repeat of the Wardha pattern in MVA big decision to win more seats there will be an exchange of candidates for the assembly election Wardha Pattern: मविआत वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती! जास्त जागा जिंकण्यासाठी मोठा निर्णय, विधानसभेसाठी उमेदवारांची होणार देवाणघेवाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/f9ac500627e0a1624a3b61f757bf92ad17267182271631075_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रत्येक पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात जागावाटप, उमेदवार, मतदारसंघातील बैठका,चर्चा, पक्षांतर या घडामोडींना आता वेग आला आहे. अशातच महाविकास आघाडीने जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आता नवनवे मार्ग किंवा नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती होईल अशी माहिती आहे. मविआच्या जागा वाटपात मतदारसंघ एका पक्षाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास मविआ करेल उमेदवारांची देवाण-घेवाण करण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी वर्धा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अनपेक्षितरित्या वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आला होता. मात्र सक्षम उमेदवार नसल्यामुळे ऐनवेळी शरद पवार गटाने काँग्रेस नेते अमर काळे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. त्याच यशस्वी वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती राज्यात अनेक ठिकाणी होऊ शकते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्रित असताना मतदारसंघांची देवाण-घेवाण होईलच सोबतच उमेदवारांचा मेरिट ही महत्त्वाचा ठरेल. यावेळी काही मतदारसंघात अशी स्थिती येईल की, मतदारसंघ एका पक्षाकडे जाईल आणि तगडा उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असेल. अशा वेळेस वर्धा पॅटर्न प्रमाणे मविआच्या अंतर्गत मित्र पक्षांमध्ये उमेदवारांची देवाणघेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सावरबांधे म्हणालेत. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळू शकते. दरम्यान, वर्धा पॅटर्न नागपूरमध्ये राबवला जाईल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही असेही ते म्हणाले. मात्र इतर अनेक मतदारसंघांमध्ये तो राबवला जाऊ शकतो.
मविआला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे असतील, तर उमेदवार आणि पक्ष दोघांनाही त्याग करावा लागेल आणि असे होत असताना उमेदवारांच्या देवाण-घेवाणीचा वर्धा पॅटर्न महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अमलात आणलं जाऊ शकतं असे सावरबांधे म्हणाले. नागपूर पूर्व मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसकडून मागितले आहे. मात्र, जर काँग्रेसने मतदारसंघ सोडले नाही, तर नागपूर पूर्वमध्ये उमेदवाराची देवाण-घेवाण होईल की नाही हे तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय करतील असे ही सावरबांधे म्हणाले आहेत.
काय आहे वर्धा पॅटर्न?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अनपेक्षितरित्या वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आला होता. मात्र सक्षम उमेदवार नसल्यामुळे ऐनवेळी शरद पवार गटाने काँग्रेस नेते अमर काळे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)