(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Conversion Case: धर्मांतर प्रकरणातील आरोपी शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांकडे, तीन दिवसांनंतर स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश
शाहनवाज याला रस्ते मार्गाने गाझियाबाद येथे नेण्यात येत असताना रस्त्यात वेळोवेळी ब्रेक घेऊन खाण्यापिण्याची व्यवस्था करावी तसेच सुरक्षित नेण्यात यावे असे आदेश दिले आहेत
Religious Conversion Case: धर्मांतराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी शहानवाजला गाझियाबाद पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. ठाणे कोर्टाने (Thane Court) हा निर्णय दिला आहे. तसेच शहानवाजला पुढील तीन दिवसात स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना (Ghaziabad Police) दिले आहेत. गाझियाबाद पोलीस शहानवाजला रस्ते मार्गाने घेऊन जाणार आहेत.
ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतराच्या (Religious Conversion Case) आरोपाखाली अटक आरोपी शहानवाज याला रविवारी अटक करण्यात आली होती. आज मुंब्रा पोलिसांनी ठाणे कोर्टात हजर केले आहे. सोबत गाझियाबाद पोलीस देखील आहेत. आज त्याला ट्रान्झिट रिमांड देण्यात ( Transit Remand) आली आहे. शाहनवाज याला रस्ते मार्गाने गाझियाबाद येथे नेण्यात येत असताना रस्त्यात वेळोवेळी ब्रेक घेऊन खाण्यापिण्याची व्यवस्था करावी तसेच सुरक्षित नेण्यात यावे असे आदेश दिले आहेत. तीन दिवसात तिकडे पोचल्यावर तिथल्या कोर्टात हजर करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे.
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून डर्टी धर्मांतराचे शिकार
मोबाईल गेमच्या (Mobile Game) नावाखील धर्मांतर करण्याचं प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केलं. ही एक मोठी टोळी असून ती ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते.सुरुवातीला या खेळात या मुलांना हरवलं जातं, मग त्यात फसवलं जातं आणि पुढे त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केला जातो. ही मुलं ऑनलाईन गेमच्या माध्यमातून डर्टी धर्मांतराचे शिकार होतात. दिल्लीच्या गाझियाबादमध्ये देखील असंच घडले आहे. ऑनलाईन गेमच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांचं धर्मांतर केलं गेले आहे. गाझियाबादमधल्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी शाहनवाज मकसूद खान हा ठाण्याच्या मुंब्र्यातील असल्याचं समोर आले आहे. ठाणे आणि गाझियाबाद पोलिसांनी एकत्र कारवाई करत त्याला अलिबागमधून अटक केली आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांना आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
शहानवाजला ठाणे पोलीसांनी अलिबाग येथून केली अटक
शहानवाज हा त्याच्या भावासोबत अलिबागमधील एका लॉजमध्ये लपून बसला होता. ठाणे पोलीस आणि गाझियाबाद पोलीसांचे पथक अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. गेल्या काही दिवसांपासून फरार असणाऱ्या शहानवाजला ठाणे पोलीसांनी अलिबाग येथून अटक केली.
हे ही वाचा :