Coronavirus : दिलासा! राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख उतरता
ब्रेक दि चेन अंतर्गत पॉझिटिव्हीटी दर, ऑक्सिजन बेडस उपलब्धताबाबत नवे आदेश
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लॉकडाऊन आणि तत्सम नियमांच्या कडक अंमलबजावणीनंतर काही अंशी नियंत्रणात येताना दिसली. हेच चित्र पाहता, अखेर प्रशासनानं टप्प्याटप्प्यानं राज्यात लागू असणारे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला. असं होत असतानाच काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढताच होता. पण, अखेर या चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये नियमांची अंमलबजावणी सक्तीनं सुरु असतानाच परिणमार्थ अनलॉ़कनंतरच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरत आहे.
कोल्हापूर
या आठवड्यात
संसर्ग दर- 13.77 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 54.78 टक्के
दुसरा आठवडा संसर्ग दर - 15.85 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 67.41 टक्के
पहिल्या आठवड्यात
संसर्ग दर- 15.85 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 71.50 टक्के
पुणे
या आठवड्यात
संसर्ग दर- 9.88 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 10.90 टक्के
दुसरा आठवडा
संसर्ग दर - 11.11 टक्के आहे
व्यापलेल्याऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 13 टक्के
पहिला आठवड्यात
संसर्ग दर- 13.62 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 20.45 टक्के
सातारा
या आठवड्यात
संसर्ग दर- 8.91 टक्के
व्यपालेल्या खाटाचे प्रमाण- 37.32 टक्के
दुसरा आठवडा
संसर्ग दर - 11.30 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 41.6 टक्के
पहिला आठवडा
संसर्ग दर- 15.62 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 61.55 टक्के
रत्नागिरी
या आठवड्यात
संसर्ग दर- 11.90 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 42.19 टक्के
दुसरा आठवडा
संसर्ग दर - 14.12 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 48.75 टक्के
पहिला आठवडा
संसर्ग दर- 16.45 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 51.81 टक्के
रायगड
या आठवड्यात
संसर्ग दर- 12.77 टक्के
व्यपलेल्या खाटा- 14.6 टक्के
दुसरा आठवडा
संसर्ग दर - 13.33 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 21.32 टक्के
पहिला आठवडा
संसर्ग दर- 19.32 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 38.30 टक्के
सिंधुदुर्ग
या आठवड्यात
संसर्ग दर- 9.06 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 55.20 टक्के
दुसरा आठवडा
संसर्ग दर - 11.89 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 51.59 टक्के
पहिला आठवडा
संसर्ग दर- 12.70 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 66.56 टक्के
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संसर्ग दर कमी झाला मात्र व्यापलेल्या खाटाचे प्रमाण काही प्रमाणात वाढलं आहे.
तर मुंबईतही कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. इथं संसर्ग दर कमी झाला असून ऑक्सिजन व्याप्त खाटाच प्रमाण ही घटल आहे.
मुंबई
या आठवड्यात
संसर्ग दर- 3.79 टक्के
व्याप्त खाटा- 23.56
मागील आठवडा
संसर्ग दर- 4.40
व्याप्त खाटा- 27.12