Maharashtra Corona Cases : राज्यात सध्या 1,39,960 अॅक्टिव्ह रुग्ण, गुरुवारी 9,830 नवे कोरोनाबाधित तर 5,890 डिस्चार्ज
Maharashtra Corona Cases : राज्यात आज 9,830 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 5,890 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 236 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,39,960 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 9,830 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 5,890 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 236 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,39,960 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 56,85,636 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.64 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 236 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.95 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,88,57,644 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,44,710 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,50,663 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,964 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 529 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 666 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 741 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मागील 24 तासात 20 मृत्यूंची नोंद मुंबईत केली आहे. मुंबईत आजवर 686866 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14,807 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 734 दिवसांवर गेला आहे.
पुणे शहरात आज नव्याने 257 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 257 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 75 हजार 97 इतकी झाली आहे. शहरातील 284 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 63 हजार 885 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 817 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 98 हजार 737 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 703 रुग्णांपैकी 437 रुग्ण गंभीर तर 669 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 509 इतकी झाली आहे.