एक्स्प्लोर

पगारवाढ नाकारुन चमकोगिरी करणाऱ्या आमदारांचं पितळ उघड

मुंबई : पगारवाढ म्हटलं की आता आमदारांच्या अंगावर काटा येऊ लागला आहे. कारण शेतकरी, बेरोजगार तरुण, विनाअनुदानित शिक्षक, टंकलेखक दोन-चार रुपये हातात मिळावेत म्हणून झगडत आहेत. आणि दुसरीकडे नेते हजारो रुपयांची पगारवाढ घेऊन फुगू लागले आहेत. मात्र या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर नेत्यांनी पगारवाढीला नकार दिला. पण ती केवळ चमकोगिरी असल्याचं उघड झालं आहे. कारण कायद्यात पगारवाढ नाकारण्याची तरतूदच नसल्याचं समोर आलं आहे.   श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील, विक्रम काळे आणि रामनाथ मोते हे आहेत महाराष्ट्रातील चमको आमदार. अधिवेशन संपायला तास उरला असताना सर्वपक्षीयांनी एकमुखानं वेतनवाढीचं विधेयक पारीत केलं.   त्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या संतापानं आमदार हादरले, आणि केवळ दिखाऊपणासाठी त्यांनी आपण वेतनवाढ नाकारत असल्याचं राणा भीमदेवी यांनी थाटात जाहीर केलं. मात्र प्रत्यक्षात आमदारांना वेतनवाढ नाकारण्याचा हक्क नसल्याचं समोर आलं आहे.   महाराष्ट्र विधीमंडळ सदस्य वेतन आणि भत्ते कायदा 1956 प्रमाणे आमदारांना वेतन आणि भत्ते मिळतात. वेतनवाढ आधी मंत्रिमंडळात नंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारीत होते आणि राज्यपालांच्या सहीनं कायद्यात रुपांतरीत होते. अर्थात कायदा सर्वांसाठी लागू होतो, त्यामुळे वेतन आणि भत्त्यांमध्ये असमानता करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक आमदाराच्या खात्यात कायद्यानुसार वेतनवाढीनुसार पैसे जमा होणार यात शंका नाही.   अर्थात वेतनवाढ नाकारणाऱ्या आमदारांना मूळ रक्कम स्वीकारुन नको असलेली वाढीव रक्कम वित्तविभागाला परत करता येते. राज्यात कायम विनाअनुदानित ज्युनियर कॉलेजांची संख्या 4 हजाराच्या घरात आहे. तर शिक्षकांची संख्या 21 हजाराच्या घरात आहे.   गेल्या 12 ते 14 वर्षांपासून या शिक्षकांना पगार मिळत नसल्यानं त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ज्याला फक्त आश्वासनांशिवाय काहीही मिळालं नाही. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न मांडणाऱ्या आमदारांनी केवळ आपल्या पगारवाढीची जितक्या आस्थेनं काळजी घेतली तितकी विनाअनुदानित शिक्षकांची का घेतली नाही? त्यांचे प्रश्न का मांडले नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे. आमदारांच्या पगारवाढीविरोधात सर्व स्तरात संताप आहे. त्यामुळेच गृहराज्यमंत्री रणजित पाटलांनीही आपण वेतनवाढ नाकारली आहे.   तुम्ही आमदारकीची शपथ घेतलीत की तुम्हाला पेन्शन लागू होते. एक टर्म आमदार राहिलात तरीही तुम्ही पेन्शनला पात्र असता. शिवाय एकपेक्षा जास्त टर्म आमदारकी भूषवली, तर प्रत्येक टर्मला वाढीव 10 हजार पेन्शन मिळते. आता राज्यात 800 माजी आमदार आहेत. तर 366 विद्यमान आमदार आहेत. यातले काही जण खासदारही झाले आहेत. त्यांना दोन्हीकडची पेन्शन मिळते. त्यामुळे हा खर्च किती मोठा आहे याची फक्त कल्पना करा.   विशेष म्हणजे 288 पैकी 253 आमदार करोडपती आहेत. आणि 10 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांची संख्याही 80 पेक्षा जास्त आहे. त्यानंतरही आमदारांचा पगारवाढीचा सोस सुटला नाही. आणि लोकांच्या संतापानंतर स्वस्त प्रसिद्धीसाठी पगारवाढ नाकारण्याची हुशारीही साधली. हे फक्त आपले नेतेच करु जाणोत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
Amravati Crime: चक्क डॉक्टरकडून साडेतीन लाखांमध्ये नवजात बाळाची विक्री; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, डॉक्टर महिलेसह पती अन् प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अमरावतीत डॉक्टरकडून चक्क साडेतीन लाखांमध्ये नवजात बाळाची विक्री; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, डॉक्टर महिलेसह पती अन् प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
Embed widget