एक्स्प्लोर
Advertisement
‘रि-इन्व्हेंट महाराष्ट्र’चा शानदार शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्रातील लघू-मध्यम उद्योग आणि सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाचे पुनर्रुजीवन करण्यासाठी एबीपी माझा ‘रिइन्व्हेंट महाराष्ट्र’चे आयोजन महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये करत आहे.
या आयोजनाला सहकार्य एचपीने दिले असून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि एमआयडीसीच्या सौजन्याने हा उपक्रम पार पडत आहे.
‘रिइन्व्हेंट महाराष्ट्र’ ही बिझिनेस टू बिझिनेस प्रकारातील मराठीतील अशाप्रकारची पहिली परिषद असेल.
महाराष्ट्रातील लघु-मध्यम आणि छोट्या उद्योगामधील नाविन्यपूर्णता अधोरेखित करणे आणि तंत्राज्ञानाच्या उपयोगाला प्रोत्साहन देणे, ही यंदाच्या या आयोजनाची संकल्पना आहे. हे आयोजन तीन टप्प्यांमध्ये केले जाणार असून मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, ठाणे आदी शहरांमध्ये ‘रिइन्व्हेंट महाराष्ट्र’ परिषद पार पडणार आहे. मुंबईत एका शानदार समारंभात याचा शुभारंभ गुरुवारी पार पडला.
पहिल्या टप्प्याच्या कार्यक्रमात राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान सचिव विजयकुमार गौतम, माजी कसोटीपटू संदीप पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकरी अधिकारी संजीव सेठी यांच्यासारखे मान्यवर सहभागी झाले होते.
लघु-मध्यम उद्योग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम यांमधील विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञान याबद्दल मान्यवरांनी यावेळी मतं व्यक्त केली. यावेळी सहा शहरांमधील सेमिनारची घोषणा करण्यात आली. स्थानिक सेमिनारमध्ये स्थानिक आमदार, खासदारांसह अनेक उद्योजक यात सहभागी होतील. त्याचबरोबर एचपीचे तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेवर यात विशेष सत्र आयोजित केले जाईल. तिसऱ्या टप्प्यात, निवडक उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात विशेष भाषणे होणार आहेत.
उद्घाटनाच्या सत्रात या परिषदेबद्दल बोलताना अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.
शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम म्हणाले, “डिजिटल लाईफ’ हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्रामध्ये ‘जास्तीत जास्त गव्हर्नर्स आणि कमीत कमी गव्हर्मेंट’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. आयटीमध्ये महाराष्ट्र १ नंबर आहे. येणाऱ्या ३ महिन्यात महाराष्ट्रातील डिजिटलमध्ये क्रांती होणार आहे. तंत्रज्ञानामुळे जमीन आणि सुविधा यांची प्रगती होते. महाराष्ट्रामध्ये ३७२ सेवा पोर्टलवर उपलब्ध आहेत. परीपूर्णता आणि वेग हे तंत्रज्ञानामुळे आले. येणाऱ्या काळात तंत्रज्ञान हे माहितीसाठी वापरले जाणार आहे. महाराष्ट्रात २९ हजार ग्रामपंचायती आहेत. येत्या मे महिन्यात १४ हजार ग्रामपंचायत ऑप्टीकल फायबरनी जोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये टेलीमेडिसन, व्हर्चुअल क्लासरूम व गव्हर्नर्स यांना वाव मिळणार आहे.”
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय सेठी म्हणाले, “ई-गव्हार्नन्समुळे एमआयडीसी क्लस्टरला भरपूर भाव मिळाला आहे. मेक इन महाराष्ट्रमध्ये भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी ८ करोडचे सामंजस्य करार झाले आहेत. ८० टक्के लघुऊद्योग महाराष्ट्रामध्ये येत असून टेक्नॉलॉजीमुळे चांगली इनवेस्टमेंट येतेय.”
या आयोजनाबद्दल बोलताना क्रिकेटपटू संदीप पाटील म्हणाले की, तंत्रज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे. ते म्हणाले की आपण प्रत्येकानेच चौकटीबाहेर जाऊन विचार केला पाहिजे आणि सोयी, सुविधा व सोयी, सुविधा आणि तंत्रज्ञान एकत्र येऊन महाराष्ट्राला मोठे बनविले पाहिजे.
प्रख्यात हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत म्हणाले, “ तंत्रज्ञानामुळे २४ तासाचे ४८ तास झाले आहेत. तंत्रज्ञानामुळे स्पीड आणि स्पेस एकत्र आले. तंत्रज्ञानाच्या टेक्नॉलॉजीमुळे स्कीलची प्रगती होणार आहे आणि स्पर्धा वाढली आहे. तंत्रज्ञानामुळे ९० टक्के लोकांना उपयोग होईल, पण आतापर्यंत १० टक्के लोकांनी उपयोग केला.”
एचपीचे गुरुप्रीत ब्रार यावेळी म्हणाले, “एचपी नेहमीच ‘डिजिटल इंडिया’ या प्रकल्पामध्ये सरकारबरोबर काम करत अली आहे. महाराष्ट्र सरकारबरोबरसुद्धा कंपनीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ‘स्मॉलस्केल’मध्ये ‘बिग स्केल’ काम करण्यावर कंपनीचे भर असतो आणि त्यात त्रान्त्राज्ञानाचा फार मोठा वाट आहे. लोकांची काम करण्याची क्षमता वाढली आहे".
अभिनेत्री अमृता खानविलकरनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. “टेक्नॉलॉजी गृहिणीसाठी संजीवनी ठरली आहे. आता अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या चार गोष्टी नागरिकांसाठी महत्वाच्या ठरत आहेत. वेळेचे बंधन कमी झाले आहे. लोकांना नॅचरल टॅलेंट पुढे आले आहे.” असं तीने यावेळी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement