एक्स्प्लोर

OTA चार्जेस कमी केल्यास हॉटेल, टुरिझम इंडस्ट्रिला उभारी मिळेल?

ओटीए चार्जेस कमी केल्यास हॉटेल, टुरिझम इंडस्ट्रिला सावरण्यासाठी मदत होणार? काय आहेत ओटीए चार्जेस? ओटीएचा ग्राहकांवर परिणाम कसा होतो?

रत्नागिरी : कोरोनामुळे हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्रीचा कणा मोडला आहे. दरम्यान, या उद्योगांना उभारी देण्यासाठी ओटीए (OTA) चार्जेसचा अर्थात ऑनलाईन ट्रॅव्हल एजेंट चार्जेस मोठी भूमिका बजावू शकतात, असा एक मतप्रवाह आहे. सध्या जवळपास 70 ते 80 टक्के पर्यटक किंवा ग्राहक ऑनलाईन बुकिंग करणे पसंत करतात. त्याकरता अगदी 22 ते 30 टक्के OTA चार्जेस घेतले जातात. काही काळ अर्थात या दोन्ही इंडस्ट्री यातून पूर्णपणे सावरत नाहीत तोवर हे OTA चार्जेस किमान 50 टक्के कमी करणे किंवा 10 ते 15 टक्क्यांवर आणल्यास ग्राहक आणि या इंडस्ट्रीला याचा पूर्ण फायदा होईल असं काही उद्योजक किंवा जाणकार सांगतात.

अनलॉककडे वाटचाल करताना काही नियम आणि अटींसह हॉटेल व्यवसायाला मंजुरी देण्यात आलेली आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता किती पर्यटक येतील याबाबत शंका आहे. त्यामुळे या व्यवसायांना सावरण्यासाठी किमान काही योजना आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याचवेळेला काही जण ओटीए चार्जेस देखील कमी असावेत अशी आशा व्यक्त करतात. ओटीए चार्जेस कमी झाल्यास त्याचा फायदा हा ग्राहकांना होईल. त्यामुळे त्यांची संख्या देखील नक्कीच वाढेल असा आशावाद देखील यावेळी व्यक्त केला जात आहे.

पर्यटकांसाठी खुशखबर! MTDCचे कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स आजपासून सुरू

ओटीए चार्जेस म्हणजे काय? सध्याच्या घडीला गो आयबिबो, मेकमाय ट्रिप सारख्या अनेक वेवसाईट्स या प्रवास, राहणं आणि खाणं यांच्या बुकिंककरता वापरल्या जातात. याच वेबसाईट्सना ओटीए अर्थात ऑनलाईन ट्रॅव्हल एजेंट असं म्हणतात. यांच्या माध्यमातून एखादी बुकिंग एखाद्या हॉटेल अथवा रिसॉर्ट किंवा रेस्टारंटला मिळाल्यानंतर त्याच्या बदल्यात संबंधित हॉटेल किंवा रिसॉर्टकडून या ओटीए अर्थात या वेबसाईटना काही चार्जेस किंवा शुल्क दिले जातात. त्याला ओटीए चार्जेस असं म्हणतात.

काय आहे हॉटेल व्यवसायिकांचं म्हणणं? ओटीए चार्जेस किती असतात?

हा सारा प्रश्न आणि मुद्दा जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायिक सुहास ठाकूर - देसाई यांच्याशी संपर्क साधला. याबाबत बोलताना सुहास यांनी 'सध्याची स्थिती पाहता कोरोनामुळे हॉटेल आणि पर्यटन व्यवसाय जवळपास दोन वर्षे मागे आला आहे. त्याला उभारी देणे गरजेचं आहे. आतापर्यत लाखोजण यावर पोट भरत होते. त्यामुळे सध्या त्यांच्या उपजीविकेचा देखील प्रश्न आहेत. सध्या जवळपास 60 ते 70 टक्के बुकिंग्स या ऑनलाईन पद्धतीनं होतात. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यावेळी ओटीए अर्थात संबंधित वेबसाईट्सला 22 ते 30 टक्क्यांपर्यंत कमिशन चार्जेस द्यावे लागतात. त्यामुळे एकंदरीत किती नफा हा मालकाला मिळणार याचा विचार केल्यास साधारण एक ढोबळ आकडा समोर येतो.

पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला, अजित पवारांचा खुलासा

परिणामी यातून मार्ग काढायचा कसा? याचा सोस आम्ही ग्राहकाच्या खिशावर टाकायचा का? हा प्रश्न आहे. त्यामुळे जवळपास दोन वर्षे मागे गेलेल्या या दोन्ही व्यवसायांना सावरण्यासाठी या चार्जेसमध्ये आगामी काही कालावधीसाठी कमी करणे गरजेचा आहे. त्याबाबत दोन्ही बाजूनं विचारविनिमय होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे काही निर्णय झाल्यास त्याचा फायदा हा निश्चितच ग्राहकांना होणार असून पर्यटत किंवा ग्राहकांची संख्या देखील वाढू शकते अशी प्रतिक्रिया सुहास ठाकूर - देसाई यांनी एबीपी माझाकडे दिली आहे. तर, याबाबत ओटीए प्रतिनिधींशी बोलणे केले असता त्यांनी मात्र याबाबत आकडेवारी सांगण्यास असमर्थता दर्शवली. पण, सध्या ओटीएद्वारे होणारी बुकिंग वाढत आहे. देशात सध्या ओटीए बुकिंग जवळपास 40 ते 45 टक्के असली तरी आगामी काळात ती आणखी वाढणार असल्याचं सांगितले.

पर्यटकांचं प्रमाण नेमकं आहे तरी किती?

जर आपण देशाचा विचार केला तर, 2016 मध्ये देशात जवळपास 8 ते 8.50 लाख पर्यटक आले होते. यामध्ये 2017 मध्ये जवळपास 11 टक्क्यांची वाढ झाली. हाच आकडा लॉकडाऊनपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2020 पर्यत 10 लाख 15 हजार 632 पर्यंत वाढला होता. यावरून राज्यांतर्गत जाणाऱ्या पर्यटकांच्या आकड्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. तर, कोकणात दरवर्षी जवळपास 25 ते 30 लाख पर्यटक भेट देतात. हॉटेल आणि पर्यटक हे दोन्ही व्यवसाय परस्परपुरक असल्यानं त्यातून हजारो कोटी रूपयांची उलाढाल होते. पण, आता ओटीए चार्जेस पाहता या दोन्ही व्यवसायांना पुढील काही कालावधीकरता त्यामध्ये सुट देणे गरजेचं असल्यासं इतर देखील काही जाणकार सांगतात.

गरज उभारी देण्याची सध्याची परिस्थिती पाहता या दोन्ही व्यवसायांना उभारी देणे, त्यांना आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे. त्यासाठी ठोस निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी करणे देखील गरजेचं असल्याचं अनेक हॉटेल व्यवसायिक सांगतात. केवळ कोकण किंवा राज्य नव्हे तर देशपातळीवर याचा विचार होण्याची अपेक्षा देखील व्यवसायिक आणि जाणकार व्यक्त करतात.

Pune Health system | पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार, अजित पवार काऊनसिल हॉलमध्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget